ETV Bharat / state

पाहा आणि समजून घ्या, आपलीच सावली कशी सोडते साथ - parbhani latest news

परभणीच्या ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटीच्यावतीने आज (शनिवार) 'झिरो शॉडो डे' साजरा करण्यात आला. या दिवसाचे विशेष म्हणजे आपली सावली देखील जमिनीवर दिसत नाही, यालाच 'झिरो शॉडो डे' असं म्हटलं जातं.

parbhani
परभणीत 'झिरो शॉडो डे' साजरा
author img

By

Published : May 16, 2020, 4:56 PM IST

परभणी - अनेक वेळा असे म्हणतात की, आपलीच सावली आपली साथ सोडते. हो हे खरे आहे. असं वर्षातून दोन दिवस घडत असते. त्या दोन दिवसात सूर्य अगदी आपल्या माथ्यावर येतो आणि त्या दिवशी आपली सावली देखील जमिनीवर दिसत नाही, यालाच 'झिरो शॉडो डे' असं म्हटलं जातं. हा दिवस परभणीच्या ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटीच्यावतीने आज (शनिवार) परभणीत साजरा करण्यात आला. यावेळी सोसायटीचे सहसचिव प्रसाद वाघमारे यांनी या दिवसाबद्दलची शास्त्रीय माहिती दिली.

परभणीत 'झिरो शॉडो डे' साजरा

सध्या परभणीत तापमानाने ४२ अंशाचा पल्ला ओलांडला आहे. एकीकडे लॉकडाऊनमुळे सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. तर दुसरीकडे तळपत्या उन्हामुळे लोकांना जगणे असाह्य झाले आहे. अशाच परिस्थितीत आज परभणीत 'झिरो शॉडो डे' चा अनुभव नागरिकांनी घेतला. या दिवशी पृथ्वीच्या मधोमध विषुववृत्त असते. २१ डिसेंबरला उत्तरायण सुरू होते. ज्यामुळे सूर्य हा पृथ्वीच्या दक्षिणेकडून उत्तरेकडे जात असतो. त्यानुसार ९ एप्रिलला भारताच्या रामेश्वरम येथे हा झिरो शॉडो डे अनुभवता आला. त्यानंतर सूर्य उत्तर दिशेकडे प्रवास करतो. त्यानुसार परभणीत हा क्षण आज शनिवारी १६ मे च्या दिवशी दुपारी १२ वाजून १९ मिनिटांनी अनुभवता आला. यावेळी एक मिनिटभराच्या क्षणात आपली सावली गायब झालेली दिसून आली. कुठल्याही लंबाकार वस्तूची सावली जमिनीवर पडत नव्हती. येथील डॉ. रामेश्वर नाईक यांच्या पुढाकारातून स्थापन झालेल्या ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटीच्यावतीने शहरातील प्रभावती नगरात सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून काही मोजक्या खगोलप्रेमींच्या उपस्थितीत या दिवसानिमित्त विशेष माहितीपर कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी सोसायटीचे सहसचिव प्रसाद वाघमारे यांनी या संदर्भातील माहिती दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.