ETV Bharat / state

"संक्या काहीही व्हायलय बे हे", संकर्षण कऱ्हाडेची 'कोरोना'वर मराठवाडा स्टाईल कविता

प्रसिद्ध अभिनेता संकर्षण कऱ्हाडे याच्या कवितेचे शीर्षक आहे, 'संक्या काहीही व्हायलय बे हे...! संकर्षण कऱ्हाडे याने ही कविता आपल्या समाजमाध्यमांवरील मित्रांसाठी तयार केली आहे. ही कविता त्याला परभणीतील आपल्या मित्रासोबत बोलत असताना त्याच्या एका वाक्यातून सुचली आहे. ते वाक्य होतं 'संक्या काहीही व्हायलय बे हे'.

actor sankarshan karhade wrote and sing a poem on corona
संकर्षण कऱ्हाडेची 'कोरोना'वर मराठवाडी स्टाईल कविता
author img

By

Published : May 14, 2020, 11:45 AM IST

Updated : May 14, 2020, 12:36 PM IST

परभणी - गेल्या काही महिन्यांपासून 'कोरोना'ने जगभर दहशत निर्माण केली आहे. अशात या विषाणूच्या संकटात नागरिकांना दिलासा मिळावा म्हणून अनेकजण आपापल्या परीने कविता, भारुडे, गाणी, पोवाडे, कीर्तन अशा विविध रचना करत आहेत. आपापल्या अंदाजात त्या सादर करण्याचा प्रत्येकजण प्रयत्न करत आहे. यात आता भर पडली आहे, संकर्षण कऱ्हाडेच्या मराठवाडी स्टाईल कवितेची.

मूळचा परभणीतील असलेला प्रसिद्ध अभिनेता संकर्षण कऱ्हाडे याच्या कवितेचे शीर्षक आहे, 'संक्या काहीही व्हायलय बे हे...! संकर्षण कऱ्हाडे याने ही कविता आपल्या समाजमाध्यमांवरील मित्रांसाठी तयार केली आहे. ही कविता त्याला परभणीतील आपल्या मित्रासोबत बोलत असताना त्याच्या एका वाक्यातून सुचली आहे. ते वाक्य होतं 'संक्या काहीही व्हायलय बे हे'.

संकर्षण कऱ्हाडेची 'कोरोना'वर मराठवाडा स्टाईल कविता

या कवितेत खास परभणीची बोलीभाषा वापरण्यात आली आहे. ही बोली भाषा संपूर्ण मराठवाड्यात वापरली जाते. मात्र, तिचे उगमस्थान परभणी जिल्ह्यातील आहे. परभणी जिल्ह्यात ही भाषा सर्रास प्रत्येकाच्या तोंडून ऐकायला मिळते. याच भाषेत संकर्षणने आपली ही कविता सादर केली आहे. यापूर्वी त्याने 'जगात जर्मनी आणि भारतात परभणी' ही आपली कविता अनेकवेळा लोकांना ऐकवली आहे. त्याच्या स्टाईलमधीलच ही नवीन कोरोनावरील कविता आता लोकांच्या पसंतीस उतरत आहे.

Last Updated : May 14, 2020, 12:36 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.