ETV Bharat / state

परभणीत बुधवारी सापडले 9 कोरोना पॉझिटिव्ह; एकूण रुग्णसंख्या 16

author img

By

Published : May 21, 2020, 12:33 PM IST

या पार्श्वभूमीवर पूर्णा शहरात 3 दिवस संचारबंदी व कोरोनाबाधित रुग्णांची गावे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आली आहेत. तर, शेळगाव हे यापूर्वीच सील करण्यात आले आहे.

parbhani corona
parbhani corona

परभणी - जिल्ह्यात बुधवारी आतापर्यंतची सर्वाधिक 9 रुग्णांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यात सोनपेठ तालुक्यातील शेळगावात यापूर्वीच मुंबईहून परतलेल्या कोरोनाबाधित महिलेच्या संपर्कातील 6 जणांचा समावेश आहे. याशिवाय गंगाखेड, परभणी आणि पूर्णा तालुक्यातील प्रत्येकी 1 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 16 वर पोहोचली आहे.

या पार्श्वभूमीवर पूर्णा शहरात 3 दिवस संचारबंदी व कोरोनाबाधित रुग्णांची गावे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आली आहेत. तर, शेळगाव हे यापूर्वीच सील करण्यात आले आहे.

108 प्रलंबित अहवालाची प्रतीक्षा -

सुमारे दोन महिने ग्रीन झोनमध्ये राहणाऱ्या परभणीची वाटचाल आता अचानक रेड झोनकडे होऊ लागली आहे. ज्यामुळे जिल्हावासीयांमध्ये घबराट पसरली आहे. दरम्यान, कोरोना विषाणुच्या पार्श्‍वभूमीवर परभणी जिल्हा शासकीय रुग्णालयात बुधवारी संध्याकाळपर्यंत संशयितांची संख्या 1585 पर्यंत पोहचली आहे. त्यापैकी 1428 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून एकूण 16 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर, 11 संशयितांचे अहवाल अनिर्णायक आहेत. महत्त्वाचे म्हणजे 108 प्रलंबित अहवालाची प्रतीक्षा आहे. याशिवाय बुधवारी जिल्हा रुग्णालयात नव्याने 86 संशयित दाखल झाले असून, त्यांचे स्वॅब नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱयांनी दिली.

एकूण दाखल 1585 संशयितांपैकी विलगीकरण कक्षात 410 आणि रुग्णालयातील संसर्गजन्य कक्षात 118 जण आहेत. तर विलगीकरणाचा कालावधी पूर्ण झालेले 1049 रुग्ण आहेत. बुधवारी जिल्हा शासकीय रुग्णालयास सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात एकूण 9 जणांचे स्वॅब पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यात शेळगावात मुंबईहून परतलेल्या कोरोनाबाधित महिलाव्यतिरिक्त तिच्या संपर्कातील 6 जणांचे स्वॅब पॉझिटिव्ह आढळले. तर गंगाखेड तालुक्यातील नागठाणा येथील 1, परभणी तालुक्यातील पिंपळगाव ठोंबरे येथील 1 आणि पूर्णा तालुक्यातील माटेगाव येथील 1 रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यातील शेळगाव येथे सापडलेली महिला मुंबई येथून परतली होती. तर बुधवारी आढळलेले 6 रुग्ण देखील तिच्यासोबतच मुंबई येथून आलेले होते.

याशिवाय परभणी, पूर्णा आणि गंगाखेड तालुक्यात सापडलेले प्रत्येकी एक-एक रुग्ण देखील मुंबईतून परतलेले आहेत. यातील पूर्णा तालुक्यात सापडलेला रुग्णाचे मुंबईतून परतल्यानंतर पूर्णा शहराजवळच्या लासिना शिवारातील मागासवर्गीय मुलीच्या वसतीगृहात संस्थात्मक विलगीकरण करण्यात आले होते. त्यामुळे पूर्णा शहर व लगतच्या तीन किलोमीटर परिसरात बुधवारी रात्री बारा वाजल्यापासून 23 मेच्या रात्री 12 वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. शिवाय परभणी तालुक्यातील पिंपळगाव ठोंबरे आणि गंगाखेड तालुक्यातील नागठाणा ही गावे देखील प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आली असून, या सर्व गावांमध्ये निर्जंतुकीकरण करण्याचे काम आणि ही गावे सील करण्याची प्रक्रिया तात्काळ सुरू करण्याचे आदेश देखील जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.