परभणी - जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या इच्छुकांपैकी 16 जणांचे उमेदवारी अर्ज अवैध ठरले. तर उर्वरित 85 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. दरम्यान, या निवडणुकीत पाथरी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष आमदार बाबाजानी दुर्राणी व जिंतूर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मतदारसंघातून भाजपाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर या दोघांनी एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली आहे.
यांचे अर्ज ठरले वैद्य -
परभणी विविध कार्यकारी सेवा सहकारी व धान्य अधिकोष मतदारसंघातून सुरेश वरपुडकर, समशेर वरपुडकर, दत्ता गोंधळकर, जिंतूरमधून रामप्रसाद बोर्डीकर, सेलूतून मेघना बोर्डीकर, वर्षा लहाने, पाथरीतून बाबाजानी दुर्राणी, मानवतमधून पंडीतराव चोखट, आकाश चोखट, गंगाधरराव कदम, सोनपेठातून गंगाधर कदम, श्रीकांत भोसले, राजेश विटेकर, गंगाखेडातून यशश्री सानप, भगवान सापन, सुभाष ठवरे, पालममधून गणेशराव रोकडे, नारायण शिंदे, लक्ष्मण दुधाटे, तुषार दुथाटे, पूर्णेतून पांडूरंग डाखोरे, बालासाहेब देसाई, अरुण गुंडाळे, हिंगोलीतून आमदार तानाजी मुटकुले, दत्तराव जाधव, गुलाब सरकटे, सेनगावातून रुपाली पाटील, राजेंद्र देशमुख, औंढा नागनाथमधुन शेषराव कदम, राजेश पाटील, गयाबाराव नाईक, मनिष आखरे, वसमतमधून अंबादास भोसले, दत्तराव काळे, सविता नादरे, खोबराजी नरवाडे, चंद्रकांत नवघरे, कळमनुरीतून सुरेश वडगावकर, यशोदा चव्हाण, शिवाजी माने, शेतमाल प्रक्रिया मतदारसंघातून भावना कदम, सुरेश देशमुख, बालासाहेब निरस, सुशील देशमुख, इतर शेती संस्थेमधून विजय जामकर, समशेर वरपुडकर, शशिकांत वडकुते, चंद्रकांत चौधरी, भगवान वटाणे, आनंद भरोसे, सोपान करंडे, ज्ञानेश्वर जाधव, बालाजी त्रिमल्ले, महिलामधून विद्या चौधरी, संजीवनी वटाणे, यशश्री सानप, रुपाली पाटील, अंजली देशमुख, प्रेरणा वरपुडकर, करुना कुंडगीर, भावना कदम, वेणू आहेर, अनुसूचित जातीतून शिवाजी मव्हाळे, प्रशास ठाकूर, व्दारकाबाई कांबळे, डॉ.सिध्दार्थ भालेराव, डॉ.प्रतिभा भालेराव, अतुल सरोदे, गौतम मोगले, सुशील मानखेडकर, विमुक्त जाती भटक्या जमातीतून दत्तात्रय मायंदळे, भगवान वटाणे, पकंज राठोड, भगवान सानप, सुमीत परिहार, स्वराज परिहार, सुरेश गिरी, करुणा कुंडगीर, नारायण पिसाळ, इतर मागास प्रवर्गातून अंजली देशमुख, भगवान वाघमारे, प्रल्हाद चिंचाणे, प्रशांत कापसे व मनिष आखरे यांचे उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत.
आमदार दुर्राणी, माजी आमदार बोर्डीकरांची बिनविरोध निवड -
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार बाबाजानी दुर्राणी व भाजपाचे नेते माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर या दोघांच्याही मतदारसंघात त्या दोघा मातब्बर व्यक्तीरिक्त अन्य कोणचेही उमेदवारी अर्ज अंतिम मुदतीत दाखल झाले नाही. त्यामुळे हे दोघे बिनविरोध निवडून येणार हे स्पष्ट झाले. मंगळवारी या दोघांच्या अर्जावर छाननी प्रक्रिये दरम्यान सुध्दा कोणाकडून आक्षेप दाखल झाला नाही. त्यामुळे या दोघांचे अर्ज वैध ठरणार, हे स्पष्ट आहे. निवडणुक निर्णय अधिका-याद्वारे त्याबाबत औपचारिकरित्या घोषणा करणे बाकी आहे. आमदार दुर्राणी हे जिल्हा बँकेवर वरपूडकर यांच्या गटामार्फत तर बोर्डीकर हे स्वतःच्या नेतृत्वाखालील गटामार्फत रिंगणात उतरले आहेत. बोर्डीकर यांचे गेले अनेक वर्ष जिल्हा बँकेवर निर्विवाद वर्चस्व होते. आता ते पुन्हा बंँकेवर बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे दोन्ही स्पर्धी गटाकडून प्रत्येकी एक जागा बिनविरोध आल्यात जमा आहे.
हेही वाचा- Corona Bulletin : राज्यातील कोरोना परिस्थितीचा वेगवान आढावा