ETV Bharat / state

पुर्णामध्ये सापडल्या डिटोनेटरच्या २० स्फोटक कांड्या, 'एटीएस' ने एकाला केली अटक - jiletin

सध्या सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे. अनेक ठिकाणी गर्दी होत असून याचा फायदा घेत काही समाजकंटक लोकांकडून घातपात घडवण्याची शक्यता असते. या पार्श्वभूमीवर परभणी एटीएसने तपासणी मोहीम सुरू केली आहे.

डिटोनेटरच्या कांड्या घेऊन जाणारा ट्रॅक्टर
author img

By

Published : Sep 8, 2019, 2:23 AM IST

परभणी - गणेशोत्सवाच्या काळात कुठेही घातपात घडू नये, यासाठी जिल्ह्यात दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) ठिकठिकाणी पाहणी करत आहे. या दरम्यान शनिवारी पुर्णा तालुक्यात डिटोनेटरच्या २० स्फोटक कांड्या सापडल्या आहेत. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून पुर्णा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा - परभणी गणेश दर्शन खास तुमच्यासाठी; बघा सामाजिक, पर्यावरणीय संदेश देणारे देखावे...

सध्या सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे. अनेक ठिकाणी गर्दी होत असून याचा फायदा घेत काही समाजकंटक लोकांकडून घातपात घडवण्याची शक्यता असते. या पार्श्वभूमीवर परभणी एटीएसने तपासणी मोहीम सुरू केली आहे. यादरम्यान, पूर्णा तालुक्यात एटीएसच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक विश्वास खोले, शेख अजहर पटेल, दीपक मुदीराज यांनी पूर्णा ते चुडावा दरम्यान संशयित ट्रॅक्टर (क्र.RJ06C2683) पकडला होता. या ट्रॅक्टरची तपासणी करत असताना लोखंडी बॉक्समध्ये डिटोनेटरच्या स्फोटक जिलेटीन कांड्या आढळून आल्या आहेत.

हेही वाचा - पडघम विधानसभेचे.. परभणीतील चारही मतदारसंघासाठी भाजपकडून 51 इच्छुकांच्या मुलाखती

या प्रकरणी चालक शेख खाजा शेख इसाक (रा.वसमत, जि.हिगोली) याच्यावर पुर्णा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. स्फोटक जिलेटिन बाळगल्याप्रकरणी प्रकरणी कलम 345 आणि भा द वि 286 अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, एटीएसदेखील या जिलेटिनचा कुठे घातपात घडवण्यासाठी वापर होणार होता का? या दृष्टिकोनातून तपास करत आहे. २० कांड्यांसह ट्रॅक्टर, असा २ लाख ३०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

हेही वाचा - 'चांद्रयान- 2 मोहीम ९५ टक्के यशस्वी', ऑर्बिटर ७ वर्षे करणार चंद्राचा अभ्यास

घरमालक, जागामालकांना पोलिसांचं आवाहन

पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांनी जिल्ह्यातील घर मालकांना आपल्या भाडेकरूबाबत संपूर्ण माहिती पोलिसांना कळवण्याचे आवाहन केले आहे. ही माहिती न देणाऱ्या काही घर मालकांवर यापूर्वी गुन्हेदेखील दाखल झाले आहेत. यापुढे असा निष्काळजीपणा करणार्‍या घरमालकांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारादेखील पोलीस अधीक्षकांनी दिला आहे.

Intro:परभणी - गणेशोत्सवाच्या काळात कुठेही घातपात घडू नये, यासाठी परभणी 'एटीएस' पथकाच्या वतीने जिल्ह्यात ठिकठिकाणी भेटी देऊन पाहणी करण्यात येत आहे. अशीच पाहणी करण्यासाठी आज (शनिवारी) पूर्णा तालुक्यात गेलेल्या 'एटीएस'च्या पथकाला डिटोनेटरच्या 20 स्फोटक कांड्या मिळून आल्या. या प्रकरणात एकाला अटक केली असून, त्याच्यावर पूर्ण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.Body:सध्या सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे अनेक ठिकाणी गर्दी होते आणि याच गर्दीचा फायदा घेऊन काही समाज कंटक लोकांकडून घातपात घडण्याची शक्यता असते. या पार्श्वभूमीवर परभणी दहशतवादी विरोधी पथक अर्थात एटीएसने संपूर्ण जिल्ह्यात ठिकाणी भेट देऊन तपासणीची मोहीम सुरू केली आहे, अशी तपासणी करण्यासाठी पूर्णा तालुक्यात गेलेल्या एटीएसच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक विश्वास खोले, शेख अजहर पटेल, दीपक मुदीराज यांनी पूर्णा ते चुडावा दरम्यान संशयाने ट्रॅक्टर पकडला होता. या ट्रॅक्टरची (क्र.RJ06C2683)
तपासणी करत असताना त्याच्या लोखंडी बॉक्समध्ये डिटोनेटरच्या 20 स्फोटक जिलेटीन कांड्या मिळुन आल्या. या प्रकरणी चालक शेख खाजा शेख इसाक (रा.वसमत जि.हिगोली) याच्याकडे परवाना विचारला. मात्र त्याच्याकडे कुठलाही परवाना नव्हता. त्याने कागदपत्रे नसल्याचे सांगितले. यावरून पोलिसांनी शेख खाजा या चालकाविरुद्ध पूर्ण पोलीस ठाण्यात स्फोटक जिलेटिन बाळगल्याप्रकरणी प्रकरणी कलम 345 व भादवि 286 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. त्याला अटक करण्यात आली असून पूर्ण पोलीस या प्रकरणाचा छडा लावत आहे. दरम्यान, एटीएस देखील या जिलेटिनचा कुठे घातपात घडविण्यासाठी वापर होणार होता का ? या दृष्टिकोनातून तपास करत आहे दरम्यान, वीस कांड्यांसह ट्रॅक्टर असा 2 लाख 300 रुपयांचा मुद्देमाल देखील पोलिसांनी जप्त केला आहे.

"जागामालकांना आवाहन"

दरम्यान, पोलिस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांनी परभणी शहरातील तसेच जिल्ह्यातील घर मालकांनी आपल्या भाडेकरूबद्दल संपूर्ण माहिती घेऊन पोलिसांना कळविण्याची आव्हान एटीएस मार्फत केले आहे. विशेष म्हणजे अशा प्रकारची माहिती न देणाऱ्या काही घर मालकांवर यापूर्वी गुन्हे दाखल झाले आहेत. यापुढे देखील असा निष्काळजीपणा करणार्‍या घरमालकांना जिम्मेदार धरून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांनी तसेच एटीएसचे पोलीस उपनिरीक्षक विश्वास खोले यांनी दिला आहे.

- गिरीराज भगत, परभणी.
- सोबत :- डिटोनेटरच्या कांड्या घेऊन जाणारा ट्रक.
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.