ETV Bharat / state

Schools Closed in Parbhani : परभणीच्या नवोदय विद्यालयातील 5 शिक्षक कोरोनाबाधित; 1 ली ते 8 वीच्या शाळा बंद - परभणीतील शाळा 31 जानेवारीपर्यंत बंद

परभणीत कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ (Corona Cases Hike in Parbhani) होत आहे. त्यातच गुरुवारी (6 जानेवारी) वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ (Vasantrao Naik Marathwada Agricultural University) परिसरातील जवाहर नवोदय विद्यालयातील 5 शिक्षक कोरोनाबाधित (Jawahar Navodaya Vidyalaya) आढळून आले आहेत. त्यामुळे 1 ली ते 8वीच्या शाळा बंद करण्यात आल्या आहेत.

parbhani
नवोदय विद्यालय-आंचल गोयल
author img

By

Published : Jan 6, 2022, 11:42 PM IST

परभणी - जिल्ह्यात मागील काही दिवसात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ (Corona Cases Hike in Parbhani) होत आहे. त्यातच गुरुवारी (6 जानेवारी) वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ (Vasantrao Naik Marathwada Agricultural University) परिसरातील जवाहर नवोदय विद्यालयातील 5 शिक्षक कोरोनाबाधित (Jawahar Navodaya Vidyalaya) आढळून आले आहेत. त्यामुळे कोरोना विषाणूचा हा संसर्ग शाळेच्या माध्यमातून पसरू नये म्हणून जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी गुरुवारी संध्याकाळी उशिरा ग्रामीण व शहरी भागातील 1 ली ते 8 वी पर्यंतच्या शाळा 31 जानेवारीपर्यंत बंद (Schools Closed in Parbhani) ठेवण्याचे लेखी आदेश काढले आहेत.

  • गुरुवारी कोरोनाबाधितांची संख्या दुप्पट -

दरम्यान, परभणी जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून दररोज आढळणाऱ्या कोरोनाबाधितांचा आकडा 10 च्या आत होता. मात्र, आज गुरुवारी त्यात दुप्पट वाढ झाली असून, ती संख्या 21 वर पोहोचली आहे. यामध्ये परभणी शहरात 12 रुग्ण आढळले असून, 8 रुग्ण गंगाखेड तालुक्यातील आहेत. शिवाय परभणीत मुखेड येथील 1 रुग्ण आढळून आला आहे. परभणी शहरात आढळलेल्या रुग्णांमध्ये वसंतराव नाईक कृषी विद्यापीठातील नवोदय विद्यालयात कार्यरत असणारे 5 शिक्षक आहेत.

  • कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना -

कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी शासनाने कोरोना विषाणूचा राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 हा 13 मार्च 2020 पासून लागू करून खंड 2,3,4 मधील तरतुदीनुसार अधिसूचना निर्गमित केलेली आहे. याबाबतची नियमावलीही तयार करण्यात आली असून, ती निर्गमित करण्यात आली आहे. त्याअन्वये जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात कोव्हीड -19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना लागू करण्यात आल्या. त्या पार्श्वभूमीवर परभणी जिल्ह्यात ग्रामीण भागात इयत्ता 1 ली ते 4 थी व शहरी भागात इयत्ता 1 ली ते 8 वी पर्यंत शाळेतील वर्ग सुरु करण्यास यापूर्वी परवानगी देण्यात आली होती. मात्र आता साथरोग प्रतिबंध कायदा 1897, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 अन्वये प्राप्त अधिकारातून परभणी जिल्ह्यातील इयत्ता १ ली ते 8 वी पर्यंतच्या सर्व शाळा 31 जानेवारी पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत, असे जिल्हाधिकारी गोयल यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.

  • 'यांच्या'वर अंमलबजावणीची जबाबदारी -

दरम्यान, या आदेशाची कोणतीही व्यक्ती, संस्था किंवा संघटना यांनी अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ केल्यास किंवा यास विरोध दर्शविल्यास आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 51 से 60 व भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 तसेच साथरोग कायदा 1897 अन्वये दंडनीय / कायदेशीर कार्यवाहीस पात्र राहील, असा इशारा जिल्हाधिकारी गोयल यांनी दिला आहे. तसेच हा आदेश आज 6 जानेवारीपासून निर्गमित करण्यात आला आहे. शिवाय या आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, मनपा आयुक्त व माध्यमिक व प्राथमिक शिक्षणाधिकारी यांना देण्यात आली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.