ETV Bharat / state

परभणीत रविवारी १४ कोरोनाबाधितांचा मृत्यू; २५३ नवे रुग्ण - corona victims die in Parbhani

परभणी जिल्ह्यात आज १६ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला असून, २५३ नवे रुग्ण आढळले आहेत. तर, ७५८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

कोरोना रुग्णालय
कोरोना रुग्णालय
author img

By

Published : May 16, 2021, 9:26 PM IST

परभणी - परभणी जिल्ह्यात नव्याने आढळणाऱ्या कोरोनाबधितांच्या संख्येत घट होत आहे. मात्र, मृत्यूदर कमी होताना दिसत नाही. आज तब्बल १६ बाधितांचा मृत्यू झाला असून, २५३ नवे रुग्ण आढळले आहेत. तर, ७५८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

३ हजार ३२ बधितांवर उपचार

एप्रिल महिन्यात कोरोना रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. आता त्या संख्येमध्ये मे महिन्याच्या सुरूवातीपासून घट होताना दिसत आहे. जिल्ह्यातील बाधितांची संख्या ४६ हजार १६८ वर पोहचली असून, त्यातील ४२ हजार ५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर, ३ हजार ३२ कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. १ मेपासून आजपर्यंत दररोज आढळणाऱ्या बाधितांपेक्षा बरे होऊन घरी परतणाऱ्यांची संख्या वाढली आहे. या काळात नव्याने ९ हजार २४२ बाधित आढळले. तर, १३ हजार ८७८ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.

आतापर्यंत २ लाख ७६ हजार ३२६ जणांची तपासणी

जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण ज्या प्रमाणात वाढत होते. आता, त्याच प्रमाणात रुग्णसंख्या घटतानाही दिसून येत आहे. आज रविवारी २५३ नवीन बाधित आढळले. तर, ७५८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. गेल्या २४ तासांत १४ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सध्या जिल्हा रुग्णालयात ३ हजार ३२ कोरोनाबाधित उपचार घेत आहेत. आजपर्यंत एकूण १ हजार १३१ करोनाबाधितांचा मृत्यू झाला. तसेच, जिल्ह्यात आजपर्यंत एकूण ४६ हजार १६८ कोरोनाबाधित व्यक्ती आढळल्या आहेत. त्यापैकी ४२ हजार ५ व्यक्ती कोरोनामुक्त झाले. दरम्यान, जिल्हा रुग्णालय प्रशासनातर्फे आतापर्यंत २ लाख ७६ हजार ३२६ व्यक्तींचे नमुने तपासण्यात आले आहेत. त्यात २ लाख २९ हजार ९९३ व्यक्तींचे नमुने निगेटिव्ह आले. तर, ४६ हजार १६८ व्यक्तींचे नमुने पॉझिटिव्ह आले. १११६ आले नसून १४० नमुने नाकारण्यात आले.

१४ कोरोनाबधितांचा मृत्यू

गेल्या २४ तासांत जिल्ह्यात १४ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला. यात ९ पुरुष तर ५ महिलांचा समावेश आहे. यात सर्वाधिक मृत्यू जिल्हा रुग्णालयात ४, जिल्हा परिषदेच्या कोविड सेंटरमध्ये ४ आणि जिल्हा रुग्णालयाच्या आयटीआय इमारतीमधील कोरोना हॉस्पिटलमध्ये ३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय परभणी आयसीयू २ तर, अनन्या या खाजगी हॉस्पिटलमध्ये १ अशा एकूण १४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

हेही वाचा - पुण्यात खाद्यतेलाच्या गोडाऊनला भीषण आग; कोट्यवधींचे नुकसान झाल्याचा अंदाज

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.