ETV Bharat / state

पालघर जिल्हा परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीची 'एकला चलो'ची भूमिका?

author img

By

Published : Dec 22, 2019, 9:21 AM IST

पालघर जिल्हा परिषदेच्या एकूण 57 जागांसाठी निवडणूक घेण्यात येत असून यातील 29 जागा महिलांसाठी आरक्षित आहेत. आठ पंचायत समित्यांच्या 114 जागांसाठीही निवडणूक होत आहे.

पालघर
जिल्हा परिषद

पालघर- जिल्हा परिषद निवडणुका तोंडावर आहेत. जिल्ह्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांची महाविकास आघाडी मैदानात उतरणार की हे तीनही पक्ष स्वबळावर लढणार याबाबत तिघांमध्ये चर्चेचे गुऱ्हाळ चालू आहे. उमेदवारी अर्ज भरण्यास काही दिवसच शिल्लक असताना उभयतांमध्ये अजून चर्चासत्रेचं सुरू आहेत. त्यामुळे उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.

या जिल्हा परिषदेत भाजपचा अध्यक्ष तर शिवसेनेचा उपाध्यक्ष आणि बहुजन विकास आघाडीला काही विषय समित्या देऊन सुरुवातीच्या काळात भाजप-शिवसेना आणि बहुजन विकास आघाडीने एकञ येत सत्ता स्थापन केली. त्यानंतर पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत हे तीनही पक्ष एकमेकांच्या विरोधात लढले. सन 2019च्या लोकसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेना हे पक्ष पुन्हा एकञ आले. मात्र, बहुजन विकास आघाडीने कम्युनिस्ट पक्षासारखा नवा भिडू घेऊन दोन्ही काँग्रेससोबत महाआघाडी केली. या लोकसभा निवडणुकीत महाआघाडीतील बहुजन विकास आघाडीचे उमेदवार बळीराम जाधव यांचा पराभव करीत युतीचे राजेंद्र गावित निवडून आले. लोकसभा निवडणुकीनंतर पुन्हा विधानसभा निवडणुकीत युती विरूद्ध महाआघाडीचा सामना रंगला. पालघर जिल्ह्यातील वसई-विरार विधानसभा मतदारसंघ, बोईसर, नालासोपारा, विक्रमगड, पालघर आणि डहाणू या 6 विधानसभा मतदारसंघांपैकी एकही जागा भाजपला जिंकता आली नाही. या ठिकाणी बहुजन विकास आघाडीच्या तीन जागा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि कम्युनिस्ट पक्ष प्रत्येकी एक जागा निवडून आल्या.

पालघर जिल्हा परिषदेतंर्गत तलासरी, डहाणू, विक्रमगड, जव्हार, मोखाडा, वाडा, पालघर आणि वसई या आठ पंचायत समित्यांचा समावेश आहे. जिल्हा परिषदेच्या एकूण 57 जागांसाठी ही निवडणूक होत असून 29 जागा महिलांसाठी आरक्षित आहेत. आठ पंचायत समित्यांच्या 114 जागांसाठीही निवडणूक होत आहे.

असा असणार निवडणूक कार्यक्रम-

नामनिर्देशनपत्र सादर करणे- 18 ते 23 डिसेंबर 2019
नामनिर्देशनपत्रांची छाननी- 24 डिसेंबर 2019
उमेदवारी मागे घेणे- 30 डिसेंबर 2019 ते 1 जानेवारी 2020
मतदान- 7 जानेवारी 2020
मतमोजणीचा- 8 जानेवारी 2020

Intro:जिल्हा परिषदेचे निवडणूक  महाविकास आघाडी अवतरणार की,एकला चालो..रे? आघाडीबाबत घटकपक्षांचे चर्चेचे गु-हाळ  पालघर (वाडा)संतोष पाटील  पालघर जिल्हापरिषद निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. उमेदवारी अर्ज भरण्याचा काही दिवस राहीले आहेत. तरी या जिल्हा परिषदेसाठी जिल्ह्यात व तालुक्यात  शिवसेना -राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या  महाविकास आघाडीवर अजुन उभयतांमध्ये चर्चेचे गुऱ्हाळ चालू आहे.या निवडणूूूूकीत महाविकास आघाडीने शिवसेना -राष्ट्रवादी काँग्रेस आणि काॅग्रेस निवडणूक लढवेेल काय ?की एकला चलो .. रे ची भुमिका घेतली जातेय यावर सर्वांचे लक्ष लागले आहे.  तर उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपत चाललीय या महाविकास आघाडीच्या घटक पक्षानेही उमेदवारीचा शोध आणि उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.21 डिसेंबरला  2019ला पंचायत समितीच्या गालतरे या गणाकरीता अनुसूचित जमाती जागेसाठी बहूजन विकास आघाडीचे संतोष बुकले यांनी उमेदवारीअर्ज दाखल केला आहे तर अबिटघर गणाकरीता नागरिकांचा मागास प्रवर्ग या जागेसाठी प्रविण जाधव यांनी उमेदवार अर्ज दाखल केला आहे. पालघर जिल्हा परिषदेचा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. या जिल्हा परिषदेत भाजपचा अध्यक्ष तर शिवसेनेचा उपाध्यक्ष आणि बहुजन विकास आघाडीला काही विषय समित्या देवून सुरूवातीला काळात भाजप-शिवसेना आणि बहुजन विकास आघाडी एकञ आले.त्यानंतर पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत हे तिन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधात लढले गेले.सन 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेना हे पक्ष पुन्हा येथे एकञ आले आणि बहुजन विकास आघाडीने कम्युनिस्ट पक्षासारखा नवा भिडू घेवून दोन्ही काँग्रेसच्यासोबत महाआघाडी केली.या लोकसभा निवडणूकीत महाआघाडीतील बहुजन विकास आघाडीचे उमेदवार बळीराम जाधव यांचा पराभव करीत युतीचे राजेंद्र गावित निवडून आले. लोकसभा निवडणुकीनंतर पुन्हा विधानसभा निवडणूकीत युती विरूद्ध महाआघाडीचा सामना रंगला आणि पालघर जिल्ह्यातील वसई-विरार विधानसभा मतदारसंघ, बोईसर,नालासोपारा, विक्रमगड,पालघर आणि डहाणू या 6 विधानसभा मतदारसंघापैकी भाजपला येथे एकही जागा जिंकता आली नाही.या ठिकाणी बहुजन विकास आघाडीच्या तीन जागा, शिवसेना,राष्ट्रवादी काँग्रेस आणि कम्युनिस्ट पक्ष प्रत्येकी एक जागा मिळविल्या.  इथल्या पंचायत समित्या आणि जिल्हापरिषदा निवडणूका कम्युनिस्टपक्षाच्या साथीने लढवू असे  बविआचे सुप्रिमो हितेंद्र ठाकूर यांनी कम्युनिस्टपक्षाशी आघाडी करताना वक्तव्य दरम्यानच्या काळात केले होते. आज घडीला राज्यात भाजप शिवाय  शिवसेनेन  काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याशी महाआघाडी करत महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले आहे. जिल्ह्यात विधानसभा  निवडणूकीत  काॅग्रेस वगळता  राष्ट्रवादी काँग्रेस आणि कम्युनिस्ट पक्षाला लोकप्रतिनिधींत्व विधिमंडळात लाभल आहे.त्यामुळे जिल्हापरिषद निवडणूकीच्या लढतीसाठी थोडे बहूत बळ प्राप्त झाले आहे.  पालघर जिल्हा परिषदेंतर्गत तलासरी, डहाणू, विक्रमगड, जव्हार, मोखाडा, वाडा, पालघर आणि वसई या आठ पंचायत समित्यांचा समावेश आहे. जिल्हा परिषदेच्या एकूण 57 जागांसाठी ही निवडणूक होत असून 29 जागा महिलांसाठी आरक्षित आहेत. आठ पंचायत समित्यांच्या 114 जागांसाठी निवडणूक होत आहे. नामनिर्देशनपत्र सादर करणे- 18 ते 23 डिसेंबर 2019 नामनिर्देशनपत्रांची छाननी- 24 डिसेंबर 2019  अपील नसल्यास उमेदवारी मागे घेणे- 30 डिसेंबर 2019 अपील असल्यास उमेदवारी मागे घेणे- 1 जानेवारी 2020,मतदानाचा दिनांक- 7 जानेवारी 2020,मतमोजणीचा दिनांक- 8 जानेवारी 2020 असा निवडणूक कार्यक्रम आहे. राज्य सरकारात नव्याने शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या महाविकास आघाडी तयार झाली आहे.त्या अनुषंगाने जिल्हापरिषद स्तरावर ही महाविकास आघाडी तयार व्हावी.यासाठी शिवसेना, काॅग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात खल चालू असल्याचे एका काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याने सांगितले. तर जागावाटपाचा चर्चेचे गुऱ्हाळ वर चर्चेतून तोडगा निघत नाही म्हणून उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपत चाललीय या महाविकास आघाडीच्या घटक पक्षानेही उमेदवारीचा शोध आणि उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. ही महाविकास आघाडी जिल्हा स्तरावर किंवा तालुकास्तरावर अस्तिवात येतेय की नाही? की एकला चालो  रे...ची.भुमिका महाविकास आघाडीचे  घटकपक्ष घेतात? यावर  सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे.

Body:1) visual zp palghar 2)collector office 3)& wada panchyat samiti 4)reservations by wada block office

Conclusion:ok
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.