ETV Bharat / state

पालघर जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा; युवासेनेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

महाराष्ट्रात सर्वत्र दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, शासनाने बहुतांश जिल्हे दुष्काळग्रस्त जाहीर केले आहेत. पालघर जिल्ह्यातही गेल्या २ महिन्यांपासून तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे.

youth
author img

By

Published : Feb 6, 2019, 9:54 AM IST

पालघर - महाराष्ट्रात सर्वत्र दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, शासनाने बहुतांश जिल्हे दुष्काळग्रस्त जाहीर केले आहेत. पालघर जिल्ह्यातही गेल्या २ महिन्यांपासून तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा, या मागणीसाठी युवासेनेने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मार्चा काढला. यावेळी मोर्चामध्ये तरुण-तरुणींसह माजी सैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

youth
undefined

मुंबईलगत असलेल्या पालघर जिल्ह्यातही गेल्या २ महिन्यांपासून तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे, तरीदेखील शासनामार्फत फक्त काही गावे टंचाईग्रस्त घोषित करण्यात आली आहेत. या ठिकाणी काही प्रमाणात टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. पालघर जिल्ह्यातील पालघर, तलासरी व विक्रमगड या ३ तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. मात्र, या ३ तालुक्या व्यतिरिक्त इतर तालुक्यातही दुष्काळीची परिस्थिती आहे. येथील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

youth
undefined

यावेळी आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. या मोर्चात जिल्हाध्यक्ष राजेश शहा, जगदीश धोडी, वसंत चव्हाण, केतन पाटील, महाराष्ट्र राज्य सहसचिव युवासेना परीक्षित पाटील, पालघर जिल्हा युवासेना विस्तारक राहुल लोंढे, जिल्हा युवा अधिकारी जश्विन घरत, पालघर शहर युवा अधिकारी निमिश पाटील, जितेंद्र पामाळे आदी पदाधिकाऱ्यांसह युवासेना- युवतीसेना कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Intro:पालघर जिल्हा दुष्काळ ग्रस्त जाहीर करावा यासाठी युवसेनेची पालघर जिल्हाधिकारीकार्यालयावर धडक
Body:
पालघर जिल्हा दुष्काळ ग्रस्त जाहीर करावा यासाठी युवसेनेची पालघर जिल्हाधिकारीकार्यालयावर धडक

नमित पाटील,
पालघर, दि.5/2/2019,

संपूर्ण पालघर जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा या मागणीसाठी युवासेनेने आज पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. या मोर्च्यांत मोठ्या संख्येने युवा व युवती सैनिक सहभागी झाले होते.

महाराष्ट्रात सर्वत्र दुष्काळी परिस्थिती असून महाराष्ट्र शासनाने राज्यातील बहुतांश जिल्हे दुष्काळग्रस्त जाहीर केले आहेत. मुंबई लागत असलेल्या पालघर जिल्ह्यातही गेल्या दोन महिन्यांपासून तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे तरीदेखील शासनात मार्फत फक्त काही गावे टंचाईग्रस्त घोषित करण्यात आली आहेत. या ठिकाणी काही प्रमाणात टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.

पालघर जिल्ह्यातील पालघर, तलासरी व विक्रमगड या तीन दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. मात्र या तीन तालुक्यात व्यतिरिक्त इतर तालुक्यातही दुष्काळी परिस्थिती असून येथील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या भागातही पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच पालघर जिल्ह्यात शासनाने केलेल्या पाहणीत, या तालुक्यांमध्येही शेतकऱ्यांचे पीक 50% हून कमी आसल्याचे दिसले आहे. त्यामुळे संपूर्ण पालघर जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा, मागणीसाठी युवासेनेतर्फे पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. तसेच यावेळी आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. या मोर्चात जिल्हाध्यक्ष राजेश शहा, जगदीश धोडी, वसंत चव्हाण, केतन पाटील, महाराष्ट्र राज्य सहसचिव युवासेना परीक्षित पाटील, पालघर जिल्हा युवासेना विस्तारक राहुल लोंढे, जिल्हा युवा अधिकारी जश्विन घरत, पालघर शहर युवा अधिकारी निमिश पाटील, जितेंद्र पामाळे आदी पदाधिकाऱ्यांसह युवासेना- युवतीसेना कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Conclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.