नालासोपारा (पालघर) - नालासोपारा येथे राहणाऱ्या यश माने या तरुणाने रस्त्यावर भीक मागणाऱ्या पाच मुलांना मुंबईतील प्रसिद्ध व महागड्या ताज हॉटेलमध्ये नेऊन त्यांना ट्रीट दिली आहे. त्याने मुलांना दिलेल्या अनोख्या ट्रीटनंतर मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद गगनात मावेनासा झालेला पाहायला मिळाला. यश माने हा तरुण प्रॉपर्टी डीलिंगचे काम करून आपल्याला मिळलेल्या पैशातून तो गरीब व गरजू मुलांसाठी काम करतो. नुकतेच त्याने नालासोपाऱ्यातील रस्त्यावर भीक मागणाऱ्या मुलांना हेलिकॉप्टरमध्ये बसवून त्यांचे हवाई सफारीचे स्वप्न पूर्ण केले होते. त्यानंतर आता त्याने अशाच गरजू चार मुलांना ताजमध्ये जेवणाची ट्रीट दिली. परमेश्वर, दुश्रत, मुदासर, ज्योती आणि दिनेश अशी या पाच मुलांची नावे आहेत.
हेही वाचा - राज्यातील ग्रामपंचायती फायबर रेंजने जोडण्यात येणारं -सतेज पाटील