ETV Bharat / state

पालघरमध्ये जागतिक 'आदिवासी दिन' उत्साहात, पारंपरिक वाद्यांसह भव्य रॅली

author img

By

Published : Aug 10, 2019, 7:59 AM IST

Updated : Aug 11, 2019, 7:30 AM IST

पालघर जिल्ह्यात शिवाजी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भव्य रॅली काढत जागतिक 'आदिवासी दिन' मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पारंपरिक वेशभूषा परिधान करत हजारो आदिवासी बांधव, तरुण-तरुणींनी तारपा, धुमश्या अशा पारंपरिक वाद्यांवर तसेच डीजेच्या तालावर ताल धरत या मिरवणुकीत सहभागी झाले.

पालघरमध्ये जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा

पालघर - जिल्ह्यात शुक्रवारी जागतिक 'आदिवासी दिन' मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी पालघर शिवाजी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भव्य रॅली काढण्यात आली. पारंपारिक वेशभूषा परिधान करत हजारो आदिवासी बांधव, तरुण-तरुणींनी तारपा, धुमश्या अशा पारंपरिक वाद्यांवर तसेच डीजेच्या तालावर ताल धरत या मिरवणुकीत सहभागी झाले.

पालघरमध्ये जागतिक 'आदिवासी दिन' उत्साहात साजरा

आदिवासी जनसमूहांचे अस्तित्व, अस्मिता, सांस्कृतिक वारसा, पारंपारिक अधिकार यांचे जतन व संवर्धन करण्यासाठी २३ डिसेंबर १९९४ रोजी संयुक्त राष्ट्रसंघाने ९ ऑगस्ट हा जागतिक 'आदिवासी दिन' म्हणून घोषित केला. तेव्हापासून जगभरात ९ ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिन म्हणून साजरा केला जातो. आदिवासी एकता परिषद तसेच, राज्यभरात इतर संघटना जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

पालघर जिल्ह्यात औद्योगिक कॉरीडॉर, बुलेट ट्रेन, एक्सप्रेस वे, वाढवण बंदर, एमएमआरडीए विस्तारीकरण, फ्रेंड कॉरिडॉर, औद्योगिक वसाहती इत्यादी प्रकल्प योजनांमुळे येथील आदिवासी भूमिपुत्र आपल्या जंगलापासून, आपल्या जमिनींपासून वेगाने वंचित होत आहेत. या सर्व विनाशकारी प्रकल्पाविरोधात आदिवासी दिनानिमित्त आदिवासी बांधवांनी आपली एकजूट दाखवली.

हे सरकार भांडवलदारांचे असून ते कधीही आदिवासी, शोषित, पीडितांचे कल्याण करणार नाहीत. अन्यायाविरुद्ध तसेच आपल्या प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी सर्वांनी एक व्हा व आपल्या हक्कासाठी लढा. 'आमच्या गावात आमचेच सरकार' असे आदिवासी एकता परिषदेचे अध्यक्ष काळूराम धोदडे याप्रसंगी म्हणाले. यावेळी एकता परिषदेचे अध्यक्ष काळूराम धोदडे, शशिकांत सोनवणे, जगदीश धोडी, विश्वास वळवी आदींसह आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Intro: पालघरमध्ये जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा
Updated News
Please don't use previous news Body:पालघरमध्ये जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा Updated News
Please don't use previous news
नमित पाटील,
पालघर, दि. 9/8/2019

आदिवासी जनसमूहांचे अस्तित्व, अस्मिता, सांस्कृतिक वारसा, पारंपारिक अधिकार यांचे जतन व संवर्धन करण्यासाठी 23 डिसेंबर 1994 रोजी संयुक्त राष्ट्रसंघाने 9 ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिन म्हणून घोषित केला. तेव्हापासून जगभर 9 ऑगस्ट दिन जागतिक आदिवासी दिन म्हणून साजरा केला जातो, पालघर जिल्ह्यात आदिवासी एकता परिषद तसेच महाराष्ट्रभर इतर संघटना हा जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा करतात. जिल्ह्यात आज जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. पालघर शिवाजी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय भव्य रॅली काढण्यात आली. पारंपारिक वेशभूषा परिधान करत हजारो आदिवासी बांधव, तरुण-तरुणींनी तारपा, धुमश्या अश्या पारंपारिक वाद्यांवर तसेच डीजेच्या तालावर ताल धरत या मिरवणुकीत सहभागी झाले.

पालघर जिल्ह्यात औद्योगिक कॉरीडॉर, बुलेट ट्रेन, एक्सप्रेस वे, वाढवण बंदर, एमएमआरडीए विस्तारीकरण, फ्रेंड कॉरिडोर, औद्योगिक वसाहती इत्यादी प्रकल्प योजनांमुळे इथला आदिवासी भूमिपुत्र आपल्या जंगलापासून आपल्या जमिनीपासून वेगाने बेदखल होत आहे. यासर्व विनाशकारी प्रकल्पाला विरोधात आदिवासी दिनानिमित्त आदिवासी बांधवांनी आपली एकजूट दाखवली.

हे सरकार भांडवलदारांचे असून हे सरकार कधीही आदिवासी शोषित पीडितांच्या कल्याण करणार नाहीत. अन्यायाविरुद्ध तसेच आपल्या प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी सर्वांनी एक व्हा व आपल्या हक्कासाठी लढा.'आमच्या गावात आमचेच सरकार' असे आदिवासी एकता परिषदेचे अध्यक्ष काळूराम धोदडे याप्रसंगी म्हणाले.

याप्रसंगी एकता परिषदेचे अध्यक्ष काळूराम धोदडे, शशिकांत सोनवणे, जगदीश धोडी, विश्वास वळवी आदिंसह आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Byte- काळूराम धोदडे
Please don't use previous news Conclusion:
Last Updated : Aug 11, 2019, 7:30 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.