ETV Bharat / state

गरिबीला कंटाळून 3 वर्षीय मुलीला आईनेच दिली फाशी, स्वत:ही केली आत्महत्या - पालघर बातमी

गरिबीला कंटाळून एका महिलेने आपल्या तीन वर्षीय मुलीची हत्या करुन स्वतःही गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना पालघर जिल्ह्यात घडली आहे. याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Jun 27, 2020, 8:59 AM IST

Updated : Jun 27, 2020, 2:17 PM IST

पालघर - गरिबीला कंटाळून स्वतःच्या तीन वर्षीय मुलीला फाशी देऊन त्याच साडीने गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना बुधवारी (दि. 24 जून) सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास जव्हार तालुक्यातील देहरे कवडव्याची माळ याठिकाणी घडली आहे.

बोलताना आदिवासी विकास क्षेत्र आढावा समितीचे अध्यक्ष विवेक पंडित

याबाबत मृत मंगला वाघ यांचे पती दिलीप वाघ यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. वाघ कुटुंबीय रोजंदारीतून आपला उदर निर्वाह करत होते. पण, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या टाळेबंदीमुळे त्यांच्या हाती काहीच काम मिळत नव्हते. त्यामुळे त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे अखेर मंगला वाघ यांनी बोरीचा माल याठिकाणी स्वतःच्या मुलीची हत्या करुन आत्महत्या केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

याबाबत जव्हारचे तहसीलदार संतोष शिंदे यांच्याशी यावर संपर्क साधला ते म्हणाले, मृत व्यक्तीने घरी धान्य नसल्यामुळे आत्महत्या केली नाही. कारण, त्यांनी तीन महिन्याचे धान्य रेशन दुकानदाराने दिले असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा - मुंबई-अहमदाबाद महामार्गावर कारचा भीषण अपघात; पाच जणांचा जागीच मृत्यू

Last Updated : Jun 27, 2020, 2:17 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.