ETV Bharat / state

मनोर येथे पत्नी व प्रियकराने सुपारी देऊन केली पतीची हत्या

वसई येथे कार्यरत असलेल्या महिला कॉन्स्टेबलच्या पतीच्या हत्या प्रकरणात कॉन्स्टेबल पत्नी व एक पोलीस राईटर यांच्यासह तिघांना पालघर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

accused
अटक केलेले आरोपी
author img

By

Published : Mar 3, 2021, 5:41 PM IST

Updated : Mar 3, 2021, 6:43 PM IST

पालघर(वसई) - वसई येथे कार्यरत असलेल्या महिला कॉन्स्टेबलच्या पतीच्या हत्या प्रकरणात कॉन्स्टेबल पत्नी व एक पोलीस राईटर यांच्यासह तिघांना पालघर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मृत पती पुंडलिक पाटील यांची पत्नी महिला पोलीस कॉन्स्टेबल हिचे त्याच पोलीस ठाण्यातच कार्यरत असलेल्या पोलीस रायटरसोबत असलेल्या अनैतिक संबंधातून ही हत्या करण्यात आल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.

दत्तात्रय शिंदे पोलीस - अधीक्षक, पालघर

पत्नी व प्रियकर यांनी सुपारी देऊन केली पतीची हत्या -

वसई येथे कार्यरत असलेल्या महिला पोलीस कॉन्स्टेबल स्नेहल पाटील व पोलीस रायटर विकास पष्टे यांचे अनैतिक संबंध होते. स्नेहल पाटील हिचे पती पुंडलिक पाटील यांना संपवण्याची सुपारी तिघांना दिली. रिक्षाचालक असलेल्या पुंडलिक पाटील यांच्या रिक्षातून सुपारी घेतलेल्या तिघांनी दोनवेळा मनोर मस्तानाकापर्यंत भाडे घेण्याच्या नावाने प्रवास केला. मात्र, तिसऱ्यांदा प्रवास करताना ढेकाळे गावच्या हद्दीत पुंडलिक पाटील यांच्या डोक्यावर वार करत त्यांची हत्या केली. रिक्षा पलटी करून हा अपघात झाल्याचे भासवण्याचा प्रयत्न आरोपींकडून करण्यात आला.

रिक्षात आढळला होता मृतदेह -

मनोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत वरई येथे एका उलटलेल्या रिक्षात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह स्थानिकांना आढळून आला होता. मृताच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार करत त्यांची हत्या करण्यात आली व अपघात असल्याचे भासविण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणी मनोर पोलीस ठाण्यात अज्ञातांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पाच जणांना अटक -

या हत्याप्रकरणी महिला पोलीस कॉन्स्टेबल स्नेहल पाटील व पोलीस रायटर विकास पष्टे या दोघांसह सुपारी घेणारे अविनाश भोइर, स्वप्नील गोवारी, विशाल पाटील हे तीन आरोपी अशा एकूण पाच आरोपींना अटक केली आहे.

Last Updated : Mar 3, 2021, 6:43 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.