ETV Bharat / state

महायुतीचा घटक पक्ष असलेल्या कुणबीसेनेला काय? विस्तारात की विस्तारानंतर - Kunbi Sena

2019 च्या लोकसभा निवडणुकीत कुणबी सेनेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर काही अटी शर्ती ठेवत घटक पक्ष म्हणून महायुतीच्या उमेदवारांना पाठींबा दिला. मत्रिमंडळ विस्तारात विखे पाटीलांना माजी रिक्त कृषी मंत्रीपद हे विखेंकडे गेले तर कुणबी सेनेने मागणी केलेल्या मंत्री पदा ऐवजी त्यांना महामंडळ कींवा विधानपरिषद या दोन मागण्या राहतील असे राजकीय सुत्रांकडून सांगितले जात आहे.

महायुतीचा घटक पक्ष असलेल्या कुणबीसेनेला काय? विस्तारात की विस्तारानंतर
author img

By

Published : Jun 15, 2019, 1:11 PM IST

पालघर (वाडा) - राज्य सरकार मंत्रिमंडळाचा विस्तार करत असल्याची चर्चा सद्या सुरू आहे. लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान भाजपचे दार ठोठावणाऱ्या मोहीते आणि विखे-पाटील यांच्या नावाची चर्चा होताना दिसत आहे. मात्र, या लोकसभा निवडणुकीच्या काळात भिवंडी लोकसभा मतदार संघात कुणबी सेना प्रमुख विश्वनाथ पाटील येथे भाजपच्या उमेदवारालाच पाठींबा देऊन महाआघाडीत सामिल झाले. त्यांना घटकपक्ष म्हणून मान्यता मिळाली. यावेळी विस्तारात घटक पक्षातील कुणबी सेनेला काय पदरात मिळतय की वेटींगवर ठेवले जाते. हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

त्यांनी या अगोदर ठाणे जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष पदाचे काम पाहीले आहे. भाजपमध्ये प्रदीर्घ काळावधी नंतर त्यांनी मतभेदांमुळे कुणबी सेना स्थापन केली. यानंतर कुणबी सेनेच्या राजकीय झंझावातात ठाणे जिल्हा परिषद या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ते सत्तेचे भागीदार राहीले. यानंतर विधानसभा, लोकसभा कुणबी सेनेने लढवल्या. विश्वनाथ पाटील यांनी भिवंडी लोकसभा निवडणूक अपक्ष म्हणून लढवली. अपक्ष असताना 77 हजारांहून अधिक मताधिक्य मिळवले. हा मताधिक्याचा आलेख पाहून तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्या विद्यमान खासदार सुरेश टावरे यांना तिकीट नाकारून 2014 च्या लोकसभा निवडणूकीत विश्वनाथ पाटील यांना काँग्रेसची उमेदवारी दिली.

काँग्रेसच्या सत्ता काळातही पृथ्वीराज चव्हाणांनी कुणबी सेनेच्या वर्धापन मेळाव्यात कुणबी समाजा करता शामराव पेजे अर्थिक विकास महामंडळ निर्माण करुन त्याला निधीची तरतूद करू असे सांगितले. मात्र, पुढे काँग्रेसला सत्तेचा राजयोग आला नाही आणि महामंडळ मिळण्याच्या आशाच धुसर बनल्या. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत कुणबी सेनेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर काही अटी शर्ती ठेवत घटक पक्ष म्हणून महायुतीच्या उमेदवारांना पाठींबा दिला. यामुळे भाजपचे खासदार निवडून आले. मंत्रिमंडळ विस्तारात विखे पाटीलांना माजी मंत्री एकनाथ खडसे ते दिवंगत मंत्री भाऊसाहेब फुंडकर यांच्या नंतर रिक्त कृषी मंत्रीपद हे विखेंकडे गेले तर कुणबी सेनेने मागणी केलेल्या मंत्री पदा ऐवजी त्यांना महामंडळ कींवा विधानपरिषद या दोन मागण्या राहतील असे राजकीय सुत्रांकडून सांगितले जात आहे. मात्र, मंत्री मडळ विस्तारात कुणाला काय मिळते आणि कुणबीसेनेला काय मिळते हे आगामी काळात समजणार आहे.

Intro:कुणबी सेना प्रमुख विश्वनाथ पाटील यांचे संग्रही फोटो
न्यूज
मंञी मंडळ विस्तारात घटक पक्षांना कायBody:-Conclusion:-
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.