पालघर/वसई - वालीव पोलीस ठाण्याच्या हद्दीत कामण परिसरात पोलिसांनी एका कंटेनर मधून लाखो रुपये किमतीचा तंबाखूजन्य पदार्थाचा मोठा साठा जप्त केला आहे. 26 ऑक्टोंबर रोजी पहाटे 6 वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी ही कारवाई केली असून या प्रकरणी दोन आरोपींना अटक करत त्यांच्या विरोधात वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
वालीव पोलीस ठाण्याच्या हद्दीत तांबडमळ कामण येथील रॉयल कंपाऊंड जवळ वालीव पोलिसांनी पहाटे छापा टाकत एका कंटेनर मधून महाराष्ट्र शासनाने प्रतिबंध केलेला वेगवेगळ्या कंपनीचा सुगंधी पानमसाला व तंबाखू असा साठा जप्त केला आहे. सदर मुद्देमालाची किंमत 76 लाख 10 हजार 500 रुपये इतकी आहे.
या प्रकरणी वालीव पोलिसांनी तैय्यब आमीन खान हुसेन (वय 28), तारीफ खुरसीद खान ( वय 22) या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्या विरोधात वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वालीव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी व कर्मचारी ही कारवाई केली आहे.
हेही वाचा - पालघरमध्ये लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार, डहाणू पोलिसात गुन्हा दाखल
हेही वाचा - वसईतील 'कार्मेलाईट कॉन्व्हेंट इंग्लिश हायस्कूलसमोर फी सवलतीसाठी पालकांचे आंदोलन