ETV Bharat / state

सुक्यामेव्याचा दर्जा असलेली वसईची जगप्रसिध्द सुकेळी नामशेष होण्याच्या मार्गावर - सुकेळी बनवणारे वसईचे शेतकरी पायस रॉड्रिग्ज

देवगडचा हापूस, नाशिकची द्राक्षे, नागपूरची संत्री आणि पालघर जिल्ह्यातील वसईची सुकेळी प्रसिद्ध.. मात्र सुक्यामेव्याचा दर्जा असलेली वसईची सुकेळी नामशेष होण्याच्या मार्गावर..

वसईची जगप्रसिध्द सुकेळी
author img

By

Published : Nov 11, 2019, 8:22 PM IST

पालघर - जिल्ह्यातील हिच वसईची केळी ही 'सूकेळी'च्या रूपाने सगळीकडे ओळखली जात होती. मात्र गेल्या काही वर्षात निसर्गाच्या लहरीपणामुळे वसईतील केळींवर आलेल्या रोगांमूळे शेतकरी हवालदील झाला असताना, आता परतीचा पाऊस अजून मुक्कामी असल्यामुळे वसईतील सुकेळीवर संक्रांत आली आहे. पारंपरिक पद्धतीने पिकवावी लागणारी, आंबटगोड चवीची, पिवळ्या रंगाची सुकेळी ही खास ओळख. मात्र या सुकेळीची चव अजुनही खूद्द वसईकरांना कळलेली नाही, याबद्दल शेतकरी खंत व्यक्त करतात.

सुक्यामेव्याचा दर्जा असलेली वसईची जगप्रसिध्द सुकेळी नामशेष होण्याच्या मार्गावर

हेही वाचा... संजय राऊत लीलावती रुग्णालयात, सायंकाळी करण्यात येणार अॅन्जीओग्राफी

केळींमध्ये विविध जीवनसत्त्वांचे प्रमाण चांगले असल्याने ही केळी पौष्टिक असतात, त्याची आंबटगोड चवही चांगली असते. मात्र त्याबद्दल अजूनही जागरुकता होण्याची गरज आहे, असे मत 'नंदाखाल' येथील पायस रॉड्रिग्ज हे शेतकरी सांगतात. परतीचा पाऊस लांबल्याने पायस यांचे तब्बल एक लाखांचे नुकसान झाले आहे. पायस रॉड्रिग्ज यांचे आजोबा हा सूकेळी बनविण्याचा व्यवसाय करत असत. त्यांची तीसरी पिढी सध्या याच व्यवसायात असून वसईची सूकेळी इतिहासजमा होण्यापासून वाचविण्यात त्यांचा मोलाचा हात आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवावी म्हणून ते गेली काही वर्ष सुकेळी बनवित असतात. किलोला 500 रूपये, तर गावठी राजेळी 800 रूपये असे वेगवेगळ्या प्रतिनूसार भाव या सुक्यामेव्याला असतात.

हेही वाचा... जयपूरच्या राजमहालात प्रवाशांनाही करता येणार मुक्काम ; भाडे ऐकून वाटेल आश्चर्य

सुकेळी बनवण्याची पद्धत

केळीचे लोंगर कापल्यावर उतरवलेला घड सामान्य वातावरणात ठेवला जातो. त्याचा चीक पूर्णपणे निघून गेल्यानंतर मातीच्या रांजणात सूक्या गवतात ठेवून त्यावर दुसरे मातीचे रांजण ठेवले जाते. केळी पिकवण्याची पारंपरिक पद्धत म्हणजे त्यात भाताचे तूस व शेणी यांचा विस्तव करून ऊब देणे. तीन-चार दिवसांत केळी पिकली की ती रांजणातून बाहेर काढली जातात. नंतर ती सोलून उन्हात सुकवली जातात. त्यानंतर कडक उन्हात ती केळी सुकवली जाते. कारवीच्या मांडव घालून त्यावर ही सोललेली केळी पसरवली जातात. आठवडाभर रोज ती उन्हात दिवसभर सुकवायला मांडवावर घालायची व संध्याकाळी उन्हे उतरू लागली की, सूर्यास्ताआधी काढून पून्हा टोपलीत रचून ठेवली जाते. या केळीला जी चव असते, ती येण्यामागे शेतकऱ्यांचे एवढे परिश्रम असतात.

हेही वाचा... शुल्कवाढी विरोधात 'जेएनयू'चे विद्यार्थी रस्त्यावर, पोलिसांसोबत विद्यार्थ्यांची झटापट

सोनेरी रंगाची ही सुकलेली केळी केळीच्याच सुकलेल्या पानामध्ये म्हणजेच वावळीमध्ये बांधून विक्रीसाठी नेली जातात. या प्रक्रियेत केळीतला नैसर्गिक गोडवा फळामध्ये पूर्णपणे मुरल्याने या केळाची चव टिकून राहते. किलोवर त्याची विक्री केली जात असली तरी ती आता फार कमी शेतकरी बनवत आहेत. साधारण वातावरणात दोन महिने ही सुकवलेली केळी राहतात. फ्रीजमध्ये सहा महिन्यांपर्यंत त्यांची चव आणि रंग चांगला राहतो. यावर्षी परतीचा पाऊस अद्याप ठाण मांडून बसल्याने केळी सुकवताना पुरेसे ऊन पडले नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. नैसर्गिक आपत्तीत केळी उत्पादकाला अन्य पिकांप्रमाणे नुकसानभरपाई मिळत नसल्याने हा व्यवहार काहीसा बिनभरवशाचा आहे, अशी खंत शेतकरी व्यक्त करतात. महानगरपालिका व शासनानेही शेतकर्‍यांना मदतीचा हात पुढे करावा जेणेकरून शेतकर्‍यांना एक चांगले व्यवसायाचे साधन निर्माण होईल.

Intro:सुक्यामेव्याचा दर्जा असलेली वसईची जगप्रसिध्द सुकेळी नामशेष होण्याच्या मार्गावर....Body:स्लग : सुक्यामेव्याचा दर्जा असलेली वसईची जगप्रसिध्द सुकेळी नामशेष होण्याच्या मार्गावर....
परतीचा पाऊस लांबल्याने सुकेळी अजुन ओलीच....

पालघर / वसई : देवगडचा हापूस,नाशिकची द्राक्षे आणि नागपूरची संत्री जशी प्रसिद्ध आहेत तशी पालघर जिल्ह्यातील वसईची सुकेळी.एकेकाळी हिच वसईची केळी सूकेळीच्या रूपाने सगळीकडे ओळखली जात होती.मात्र गेल्या काही वर्षात निसर्गाच्या लहरी पणामुळे वसईतील केळींवर आलेल्या रोगांमूळे शेतकरी हवेलदील असताना आता परतीचा पाऊस अजून मुक्कामी असल्यामुळे वसईतील सुकेळीवर संक्रांत आली आहे. पारंपरिक पद्धतीने पिकवावी लागणारी, आंबटगोड चवीची, पिवळ्या रंगाची सुकेळी ही वसईची खास ओळख.अशी सुप्रसिद्घ वसईच्या सुकेळीची चव अजुनही खूद्द वसईकरांना आजही कळलेली नाही, याबद्दल शेतकरी खंत व्यक्त करतात. या केळ्यांमध्ये विविध जीवनसत्त्वांचे प्रमाण चांगले असल्याने ही केळी पौष्टिक असतात, त्याची आंबटगोड चवही चांगली असते. मात्र त्याबद्दल अजूनही जागरुकता होण्याची गरज आहे, असे मत नंदाखाल येथील पायस रॉड्रिग्ज हे शेतकरी सांगतात.परतीचा पाऊस लांबल्याने पायस यांचे तब्बल एक लाखांचे नुकसान झाले आहे. पायस रॉड्रिग्ज यांचे आजोबा हा सूकेळी बनविण्याचा व्यवसाय करीत असत.त्यांची ही तीसरी पिढी सद्या याच व्यवसायात असून वसईची सूकेळी इतीहासजमा होण्यापासून वाचविण्यात त्यांचा मोलाचा हात आहे.आपली ही वसईची सूकेळी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवावी म्हणून ते गेली काही वर्ष सुकेळी बनवित असतात. किलोला 500 रूपये,तर गावठी राजेळी 800  रूपये असे वेगवेगळ्या प्रतिनूसार भाव या सुक्यामेव्याला असतात.
वसईतील राजेळी जातीची केळी आता कमी उत्पादन होत असल्यामूळे हि राजेळी केळी केरळ राज्यातून येत असल्यामुळे मूळच्या वसईतील राजेळी केळीच्या चवीत फरक असल्याचेही ते मान्य करतात.हि सुकेळी बनवण्याची पद्धतही मोठी किचकट असते.राजेळी जातीची केळी पूर्णपणे नैसर्गिकरित्या पिकवीली गेल्यानंतरच सूकेळी बनविण्यासाठी ती उन्हात सुकवीली जातात.सुकवून, केळातला मुळ गोडवा टिकवून सुकेळी तयार करण्याची प्रक्रिया तशी किचकट तर आहेच पण वेळखाऊ व कस पणाला लावणारी ही आहे.पावसाळ्याचे तीनशमहिने सोडले तर सप्टेंबर ते जुन पर्यंतचा हा मोसम सुकेळीसाठी योग्य समजला जातो.केळीच लोंगर कापल्यावर उतरवलेला घड सामान्य वातावरणात ठेवला जातो.त्याचा चीक पूर्णपणे निघून गेल्यानंतर मातीच्या रांजणात सूक्या गवतात ठेवून त्यावर दुसरे मातीचे रांजण ठेवले जाते. केळी पिकवण्याची पारंपरिक पद्धत म्हणजे त्यात भाताचे तूस व शेणी यांचा विस्तव करून ऊब देणे.तीन-चार दिवसांत केळी पिकली की ती रांजणातून बाहेर काढली जातात.नंतर ती सोलून उन्हात सुकवली जातात. मात्र ती सोलायची, तीही भल्या पहाटे लवकर.त्यानंतर कडक उन्हात ती केळी सुकवायची.कारवीच्या मांडव घालून त्यावर ही सोललेली केळी पसरवली जातात. आठवडाभर रोज ती उन्हात दिवसभर सुकवायला मांडवावर घालायची व संध्याकाळी उन्हं उतरू लागली की सूर्यास्ताआधी काढून पून्हा टोपलीत रचून ठेवायची.नाहीतर काही वेळा दव पडून ती ओलसर झाली तर सगळी मेहनत गेली असं समजायचं.या केळ्याची जी चव असते, ती येण्यामागे शेतकऱ्यांचे एवढे परिश्रम असतात. सोनेरी रंगाची ही सुकलेली केळी केळ्याच्याच सुकलेल्या पानामध्ये म्हणजेच वावळीमध्ये बांधून विक्रीसाठी नेली जातात. या प्रक्रियेत केळ्यातला नैसर्गिक गोडवा फळामध्ये पूर्णपणे मुरल्याने या केळाची चव टिकून राहते.किलोवर त्याची विक्री केली जात असली तरी ती आता फार कमी शेतकरी बनवत आहेत. साधारण वातावरणात दोन महिने ही सुकवलेली केळी राहतात. फ्रीजमध्ये सहा महिन्यांपर्यंत त्यांची चव आणि रंग चांगला राहतो. यावर्षी परतीचा पाऊस अद्याप ठाण मांडून बसल्याने केळी सुकवताना पुरेसे ऊन पडले नाही.त्यामुळे अनेक शेतक-यांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. नैसर्गिक आपत्तीत केळी उत्पादकाला अन्य पिकांप्रमाणे नुकसानभरपाई मिळत नसल्याने हा व्यवहार काहीसा बिनभरवशाचा आहे अशी खंत शेतकरी व्यक्त करतात.
महानगरपालिका व शासनानेही शेतकर्‍यांना मदतीचा हात पुढे करावा जेणेकरून शेतकर्‍यांना एक चांगले व्यवसायाचे साधन निर्माण होईल.

बाईट : पायस राॅड्रीक्ज,सुकेळी बनवणारे शेतकरी
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.