ETV Bharat / state

Anti Encroachment Drive at Virar Beach : विरार-अर्नाळा समुद्रकिनारी तहसील विभागाची धडक कारवाई; ५० झोपड्या; २५ ढाबे जमीनदोस्त - वसईचे उपविभागीय अधिकारी स्वप्नील तांगडे

वसईचे उपविभागीय अधिकारी स्वप्नील तांगडे ( officer Swapnil Tangade ) म्हणाले, की येथील अतिक्रमणांबाबत ( encroachment at Virar Arnala beach ) तक्रारी होत्या. ही जागा मच्छीमारांना मासळी सुकविण्याकरता देण्यात आली होती. मात्र या जागेवर अतिक्रमण करण्यात आले होते. त्यामुळे ही धडक कारवाई ( Action on encroachment ) करण्यात आली.

अतिक्रमण कारवाई
अतिक्रमण कारवाई
author img

By

Published : Feb 17, 2022, 5:03 PM IST

Updated : Feb 17, 2022, 5:22 PM IST

विरार ( पालघर ) - अर्नाळा समुद्रकिनारी असलेल्या गुरचरण जागेवर बेकायदा झालेल्या अतिक्रमणांविरोधात वसई तहसील विभागाने ( Vasai Administration anti encroachment drive ) कारवाई केली आहे. ही कारवाई बुधवारी दुपारी मोठ्या पोलीस बंदोबस्तात करण्यात आली आहे . या धडक कारवाईत तब्बल ५० झोपडया आणि २४ ढाबे जमीनदोस्त ( 50 huts hotels destroyed at beach ) करण्यात आले. यावेळी संतप्त अतिक्रमणधारक महिला व पोलिसांत झटापटही झाली.

विरार-अर्नाळा समुद्रकिनारी असलेली सर्वे क्रमांक ४५/अ/१ या जागेची वसई तहसील दफ्तरी 'गुरचरण जागा' अशी नोंद आहे. मागील काही वर्षांत या जागेवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले होते. समुद्रकिनाऱ्यापासून जवळच असल्याने या ठिकाणी झोपडया आणि ढाबे, टपरी उभारण्यात आल्या होत्या. विशेष म्हणजे ही जागा तहसील विभागाने मच्छीमारांकरता मासळी सुकवणे, जाळी विणणे, बोटी शाकारणे या कामी राखून ठेवली होती. त्यानंतरही या जागेवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याने तहसील विभागाकडे तक्रारी आल्या होत्या. आगाशी मंडळ अधिकाऱ्यांच्यावतीने अतिक्रमण धारकांना ३१ नोव्हेबर २०२१ रोजी नोटीस बजाविण्यात आल्या होत्या. या नोटीसीत अतिक्रमणधारकांना स्वतःहून ही अतिक्रमणे हटवावीत, असे सूचित करण्यात आले होते. मात्र त्यांच्याकडून प्रतिसाद न मिळाल्याने तहसील विभागाने या अतिक्रमणांविरोधात धडक कारवाई केली.

विरार-अर्नाळा समुद्रकिनारी तहसील विभागाची धडक कारवाई

हेही वाचा-Congress leaders to meet CM : काँग्रेसचे नेते मुख्यमंत्री ठाकरेंच्या भेटीला; निधी वाटप वादावर चर्चा?
आम्हाला व्यवसायाकरता मुभा द्या - ढाबा चालकाची मागणी-
ढाबा चालक संतोष भोईर म्हणाले, की मी अर्नाळा ग्रामपंचायतीचा रहिवासी आहे. मागील ३० वर्षे या ठिकाणी हॉटेल व्यवसाय करत आहे. आम्हाला धडक कारवाईकरता तहसील विभाग, मेरीटाइम बोर्ड आणि वनविभाग अशा तिघांच्याही नोटीस येत आहेत. आम्ही या तिघांनाही उत्तरे दिलेली आहेत. ही जागा नेमकी कुणाची हे निश्चित करून आम्हाला व्यवसायाकरता मुभा द्या, अशी विनंती केली होती. मात्र, यावर कोणताही विचारविनिमय न करता तहसील विभागाने अशी कारवाई केली आहे. एकीकडे पर्यटनाला उत्तेजन द्या म्हणायचे आणि दुसरीकडे सेवा देणाऱ्या नागरिकांच्या दुकानांवर कारवाई करायची? हा कुठला न्याय? असा सवाल ढाबा चालक भोईर यांनी केला आहे.

हेही वाचा-Minister Nawab Malik on Chandiwal Commission : मी आयोगाच्या कामकाजाबाबत बोललो नाही, बोलणार नाही - नवाब मलिक

कुटुंबांना रस्त्यावर आणले-
स्थानिक रहिवाशी नारायण विघ्ने म्हणाले, की अर्नाळा किनारा हा पर्यटन स्थळ म्हणून घोषित झाला आहे. येथील स्थानिक आदिवासी आणि तरुण या पर्यटकांना छोटी हॉटेल्स आणि टपरी यांच्या माध्यमातून सेवा पुरवितात. याद्वारेच या दुकानदारांचा आणि त्यांच्या कुटुंबांचा उदरनिर्वाह चालतो. मात्र, तहसील विभागाने त्यांच्या दुकानांवर धडक कारवाई करून त्यांना रस्त्यावर आणले आहे.

हेही वाचा-Sanjay Raut : सोमैया यांची लोक धिंड काढतील; फडणवीस, अमित शाहांच्या नावे उकळले कोट्यवधी रुपये', संजय राऊतांचा आरोप

जागा नेमकी कुणाची?
या ठिकाणी वसलेल्या झोपड्या आणि ढाब्यांना तहसील विभाग, वनविभाग आणि मेरीटाइम बोर्डाने वेळोवेळी नोटीस बजावलेली आहे. या अतिक्रमण धारकांनी या नोटीसींना सातत्याने उत्तरे देऊन ही जागा नेमकी कुणाची? याबाबत निश्चिती करण्याची विनंती केली होती. यावर या तिन्ही विभागांनी कोणती कार्यवाही केली? याबाबत खुलासा करावा, अशी मागणी अतिक्रमणधारकांनी केली आहे.

कारवाई सुरुच राहणार-
वसईचे उपविभागीय अधिकारी स्वप्नील तांगडे ( officer Swapnil Tangade ) म्हणाले, की येथील अतिक्रमणांबाबत ( encroachment at Virar Arnala beach ) तक्रारी होत्या. ही जागा मच्छीमारांना मासळी सुकविण्याकरता देण्यात आली होती. मात्र या जागेवर अतिक्रमण करण्यात आले होते. त्यामुळे ही धडक कारवाई ( Action on encroachment ) करण्यात आली.परिसरातील सरकारी जागांवरील अन्य अतिक्रमणांवर यापुढे कारवाई करण्यात येणार असल्याचेही उपविभागीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

Last Updated : Feb 17, 2022, 5:22 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.