ETV Bharat / state

Vaccine By Drone : पालघर जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात ड्रोनद्वारे लस वाहतूक प्रयोग यशस्वी

author img

By

Published : Dec 16, 2021, 9:59 PM IST

Updated : Dec 16, 2021, 10:55 PM IST

अतिदुर्गम आणि डोंगराळ भागात कोरोना लसीचे डोस पोहचविण्यासाठी ( Deliver the Vaccine Dose ) अनेक अडचणी येत होत्या. याच पार्श्वभूमीवर पालघर जिल्ह्यातील ( Palghar District ) अतिदुर्गम भागात ड्रोनद्वारे लस पोहोचवण्याचा ( Vaccination by Drone ) अनोखा प्रयोग महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत ( Public Health Department Government of Maharashtra ) ब्लु इन्फिनीटी इनोवेशन लॅब व आय.आय.एफ.एल फाऊंडेशनच्या मदतीने राबविण्यात येत आहे.

ड्रोनद्वारे लस वाहतूक
ड्रोनद्वारे लस वाहतूक

पालघर - सध्या संपूर्ण जगात वेगवेगळया क्षेत्रात अत्याधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेऊन आपली कामे जलद व सुलभ रित्या पार पाडली जात आहेत. पालघर जिल्ह्यातील जव्हार, मोखाडा सारख्या अतिदुर्गम आणि डोंगराळ भागात कोरोना लसीचे डोस पोहचविण्यासाठी ( Deliver the Vaccine Dose ) अनेक अडचणी येत होत्या. याच पार्श्वभूमीवर पालघर जिल्ह्यातील ( Palghar District ) अतिदुर्गम भागात ड्रोनद्वारे लस पोहोचवण्याचा ( Vaccination by Drone ) अनोखा प्रयोग महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत ( Public Health Department Government of Maharashtra ) ब्लु इन्फिनीटी इनोवेशन लॅब व आय.आय.एफ.एल फाऊंडेशनच्या मदतीने राबविण्यात येत आहे.

माहिती देतांना आरोग्य विभागाचे अधिकारी

ड्रोनद्वारे लस वाहतूक

पालघर जिल्ह्यातील जव्हार, मोखाडा सारख्या अतिदुर्गम आणि डोंगराळ भागात वाहतुक पूरक सुविधा नसल्याने कोरोना लसीचे डोस पोहचविण्यासाठी अनेक अडचणी येत होत्या. यावर उपाय म्हणून जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात लस पोहोचवण्यासाठी ड्रोनची मदत घेण्यात येत असून आता कोरोना प्रतिबंधात्मक लस ड्रोनच्या मदतीने अतिदुर्गम भागातील गावांपर्यंत पोहोचवली जाणार आहे. पालघर जिल्ह्यातील जव्हार येथील झाप येथे आज लसीचे 300 डोस ड्रोनच्या मदतीने पाठवण्यात आले. 25 किलोमीटरपर्यंत 5 किलो वजन वाहून नेण्याची या ड्रोनची क्षमता आहे.

ड्रोनमुळे अतिदुर्गम भागात लस पोहोचवणे होणार शक्य

ड्रोनद्वारे लस वाहतुकीमुळे अतिदुर्गम भागात जलद गतीने लस पोचवता येणे शक्य होणार आहे. ज्यामुळे शितसाखळी अबाधीत राहील आणि प्रवासादरम्यान होणाऱ्या वेळेची व मनुष्यबळाची बचत होईल. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर आगामी काळात ड्रोनद्वारे अत्यावश्यक औषधे पाठविणे, रक्त पाठविणे, प्रत्यारोपनाकरिता अवयव एका संस्थेतुन दुसऱ्या संस्थेत पाठविणे बिना अडथळा व अत्यंत कमी वेळामध्ये सहज शक्य होणार आहे.

हेही वाचा - Bullock Cart Race : राज्य सरकारने बैलगाडी शर्यत प्रकरणाचे गुन्हे आठ दिवसात मागे घ्यावेत- गोपीचंद पडळकर

Last Updated : Dec 16, 2021, 10:55 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.