ETV Bharat / state

पालघरकडे आमचे दुर्लक्ष झाले; उध्दव ठाकरेंची जाहीर कबुली - राजेंद्र गावित

मुंबई जवळच पालघर मतदारसंघ असूनसुद्धा आतापर्यंत पालघरकडे आमचे दुर्लक्ष झाले असल्याची कबुली शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पालघर येथे दिली.

पालघरमध्ये बोलताना उध्दव ठाकरे
author img

By

Published : Apr 27, 2019, 8:03 PM IST

पालघर - मुंबई जवळच पालघर मतदारसंघ असूनसुद्धा आतापर्यंत पालघरकडे आमचे दुर्लक्ष झाले असल्याची कबुली शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पालघर येथे दिली. पालघर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार राजेंद्र गावित यांच्या प्रचार सभेत उद्धव ठाकरे यांनी बोलताना 'ही' कबुली दिली आहे.

पालघरमध्ये बोलताना उध्दव ठाकरे

पालघरमध्ये बहुजन विकास आघाडी वसई-विरार आणि पालघर मतदार संघाला लागलेली कीड आहे. त्यांची गुंडगिरी यावेळी मोडून काढू, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी हितेंद्र ठाकूर यांना दिला. बहुजन विकास आघाडी सत्ता असणाऱ्या संघटनेचे पाय चाटणारी संघटना असून त्यांच्यावर असलेल्या केसेस बाहेर येऊ नये म्हणुन ते सत्ताधारी पक्षाला पाठिंबा देतात. मात्र, आता त्यांना सोबत घेतले जाणार नसल्याचे ठाकरे म्हणाले.

काँग्रेसमधून आमदार, भाजपमधून वर्षभरासाठी खासदार आणि आता शिवसेनेचा उमेदवार असलेले राजेंद्र गावित यांचा सामना बहुजन विकास आघाडीचे बळीराम जाधव यांच्याशी होत आहे. पालघरमध्ये वर्षभरापूर्वीच पोटनिवडणूक झाली होती. त्या निवडणुकीतील मतांच्या आकडेवारीनुसार पाहिल्यास गावित यांचे पारडे यंदाच्या निवडणुकीत जड वाटत आहे. मात्र, त्यांनी मागील ५ वर्षात ३ पक्षांचा प्रवास केलेला आहे. त्यामुळे मतदार त्यांच्या पाठीशी कितपत उभे राहतील हे पाहणे औस्तुक्याचे ठरणार आहे. मात्र, उध्दव यांच्या सभेने महायुतीच्या प्रचाराला 'संजीवनी' मिळाली आहे.

Intro:मुंबईच्या जवळअसूनही पालघरकडे आमचे आजवर दुर्लक्ष: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची कबुलीBody:मुंबईच्या जवळअसूनही पालघरकडे आमचे आजवर दुर्लक्ष: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची कबुली

नमित पाटील,
पालघर, दि.27/4/2019

मुंबईच्या जवळच पालघर मतदारसंघ असूनसुद्धा आतापर्यंत पालघरकडे आमचे दुर्लक्ष झाले आहे. अशी कबुली शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पालघर येथे दिली आहे. पालघर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार राजेंद्र गावित यांच्या प्रचार सभेत उद्धव ठाकरे यांनी ही कबुली दिली आहे.

पालघरमध्ये बहुजन विकास आघाडी ही वसई-विरार व या मतदार संघाला लागलेली कीड आहे. त्यांची गुंडगिरी या वेळी मोडून काढू असा इशारा उद्धव ठाकरे यांनी हितेंद्र ठाकूर यांना दिला. बहुजन विकास आघाडी ही सत्ता असणाऱ्या संघटनेचे पाय चाटणारी संघटना असून त्यांच्यावर असलेल्या केसेस बाहेर येऊ नये म्हणुन ते सत्ताधारी पक्षाला पाठिंबा देतात. मात्र आता त्यांना सोबत घेतलं जाणार नसून त्यांची गुंडगिरी मुळासकट मोडून काढू अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी हितेंद्र ठाकूर यांच्यावर निशाणा साधला.
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.