ETV Bharat / state

पालघर येथे तुटलेल्या विद्युत वाहिनीचा धक्का लागून दोन जण जखमी

विद्युत पुरवठा करणाऱ्या तुटलेल्या तारेचा धक्का लागून दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना तलासरी येथे घडली. जखमींवर तलासरी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

विद्युत वाहिनीच्या धक्क्याने जखमी तरूण
author img

By

Published : Sep 29, 2019, 5:29 PM IST

पालघर - विद्युत पुरवठा करणाऱ्या तुटलेल्या तारेचा धक्का लागून दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना तलासरी येथे घडली. वीज वितरण विभागाचा भोंगळ कारभार दोन तरुणांच्या जीवावर बेतला आहे. मिथुन बेंडगा आणि संदीप राजड अशी त्यांची नावे आहेत. जखमींवर तलासरी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

वीज वितरण विभागाचा भोंगळ कारभार दोन तरूणांच्या जीवावर बेतला

तलासरी येथे वीज पुरवठा करणारी 240 व्हॅट विद्युत पुरवठा क्षमतेची विद्युत वाहिनी दोन दिवसांपासून तुटून पडली आहे. ग्रामस्थांनी तक्रार दिल्यानंतर वीज वितरण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने ही तुटलेली तार खेचण्याचे काम सुरू केले.

हेही वाचा - डहाणूतील आदिवासी कलाकाराने जपानच्या भिंतीवर साकारली 'वारली' संस्कृतीची कलाकृती

काम सुरू असताना अचानक तारेमध्ये विद्युत प्रवाह सुरू झाल्याने दोन जणांना विजेचा धक्का लागला. पालघरमधील ग्रामीण भागात विद्युत वाहिन्या आणि विद्युत खांबांची दुरावस्था झाली आहे. मात्र, महावितरण याकडे दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.

Intro:तलासरी येथे तुटलेल्या तारेचा शॉक लागून दोन जण जखमी; मिथुन बेंडगा, संदीप राजड अशी जखमींची नावे तलासरी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरूBody:तलासरी येथे तुटलेल्या तारेचा शॉक लागून दोन जण जखमी; मिथुन बेंडगा, संदीप राजड अशी जखमींची नावे तलासरी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू

नमित पाटील,
पालघर, दि.29/9/2019

     पालघर जिल्ह्यातील तलासरी येथे वीज महावितरण विभागाचा भोंगळ कारभार दोन इसमांच्या जीवावर बेतला आहे. वीज वितरण विभागाची 240 व्हॅट विद्युत पुरवठा करणाऱ्या तुटलेल्या तारेचा शॉक लागून दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना तलासरी येथे घडली आहे. मिथुन बेंडगा आणि संदीप राजड अशी त्यांची नावे असून जखमींवर तलासरी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

    तलासरी येथे वीज पुरवठा करणारी 240 व्हॅट विद्युत पुरवठा क्षमतेची विद्युत वाहिनी गेल्या दोन दिवसांपासून तुटून पडली होती. ग्रामस्थांनी तक्रार दिल्यानंतर वीज वितरण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने ही तुटलेली तार खेचण्याचे काम सुरू असताना अचानक तारेमध्ये विद्युत प्रवाह सुरू झाल्याने दोन ते तीन जणांना शॉक लागला. मिथुन बेंडगा आणि संदीप राजड अशी तया घटनेत जखमी झालेल्यांची नावे असून जखमींवर तलासरी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पालघर मधील ग्रामीण भागात विद्युत वाहिन्या तसेच त्यांच्या विद्युत खांबांची दुरवस्था झाली आहे. मात्र महावितरण याकडे दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांना मात्र याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे . 

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.