ETV Bharat / state

शेवग्याच्या शेंगा चोरट्यांना केलेली मारहाण बेतली जिवावर, शेतकऱ्याचा खून, दोघांना अटक - Two held for killing man

शेवग्याच्या शेंगा चोरल्याचे निमित्त पालघरमध्ये खुनात झाल्याचे दिसून आले आहे. शेंगा चोरणाऱ्याला शेतकऱ्याने मारहाण केली. त्यानंतर त्याचा बदला घेण्यासाठी दोन चोरट्यांनी शेतकऱ्याचा खून केला. या दोन चोरट्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

खून प्रकरणी दोघांना अटक प्रतिकात्मक छायाचित्र

author img

By

Published : Dec 16, 2022, 8:04 PM IST

पालघर - जिल्ह्यात शेवग्याच्या शेंगांच्या चोरी प्रकरणातून एका शेतकऱ्याची हत्या करण्यात आली आहे ( DRUMSTICKS THEFT MURDER ). या प्रकरणी खुनाच्या आरोपाखाली दोघांना शुक्रवारी अटक करण्यात आली आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.

किरकोळ कारणावरुन काय घडू शकते याचा प्रत्यय या खुनातून येत आहे. दहा दिवसांपूर्वी म्हणजेच 6 डिसेंबर रोजी या शेतकऱ्याच्या शेतात दोघेजण शिरले होते. त्यांनी शेतातील शेवग्याच्या शेंगाच्या झाडावरुन शेंगा तोडल्या. ते या शेंगा चोरत असताना शेतकऱ्याला रंगेहात सापडले. त्यामुळे चिडून शेतकऱ्याने त्यांना मारहाण केली. त्याचा राग या दोघांना अनावर झाला.

रागाच्या भरात दोघांनीही या शेतकऱ्याला बेदम मारहाण केली. त्यात या शेतकऱ्याचा मृत्यू झाला. त्यानंतर यो चोरट्यांना पोलिसांनी अटक केली आहे (Two held for killing man). त्यांना न्यायालयात हजर करण्यात येईल. रितसर पोलीस कोठडी मिळाल्यानंतर या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करतील. तपास अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे.

शेवग्याच्या शेंगांच्या चोरीची घटना 6 डिसेंबर रोजी घडली (stealing drumsticks in Palghar). त्याचवेळी दोन आरोपींनी शेतकऱ्याने मारहाण केली होती. त्यानंतर १४ डिसेंबर रोजी शेतकरी गारे यांचा मृतदेह त्यांच्या शेतात आढळून आला. त्यानंतर या प्रकरणाची पोलिसांनी चौकशी सुरू केली. त्यावेळी २४ ते २६ वयोगटातील आणि मोखाडा परिसरातील पळसुंदा येथील रहिवासी असलेल्या दोन आरोपींवर पोलिसांना संशय आला. या दोघांनीच शेतकरी गारे यांना बेदम मारहाण केल्याचे पोलिसी खाक्या दाखवताच या दोघांनी कबूल केल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.