ETV Bharat / state

पालघरमध्ये पाण्याच्या डबक्यात बुडून दोन चिमुकल्यांचा मृत्यू - डबक्यात बुडून दोन चिमुकल्यांचा मृत्यू

पालघरमधील मोखाडा येथे पाण्याच्या डबक्यात बुडून दोन चिमुकल्यांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे परिसरात खळबळ निर्माण झाली आहे.

अरशान अखलाक शेख
author img

By

Published : Aug 10, 2019, 2:08 PM IST

Updated : Aug 10, 2019, 3:31 PM IST

पालघर - अनेक दिवसांपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाले तुडुंब भरले आहेत. अशाच एका पाण्याच्या डबक्यात बुडून दोन चिमुकल्यांचा मृत्यू झाल्याची घटना मोखाडा तालुक्यात घडली आहे. फरहान शाकिर खाटीक (वय७) आणि अरशान अखलाक शेख (वय ७) असे मृत मुलांची नावे आहेत.

मोखाडा मुख्यरस्त्यावरील मशीद परिसरात राहणारे अखलाक शेख यांच्याकडे त्यांचे नातेवाईक पाहुणे म्हणून आले होते. अखलाक यांचा मुलगा अरशान आणि त्यांच्या नातेवाईकाचा मुलगा फरहान दोघेही गुरुवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घराबाहेर पडले. दोघेही खेळायला जात असतील असा घरच्यांचा समज झाला. त्यामुळे घरच्यांनी त्यांना अडवले नाही. मात्र, रात्री खूप उशीर झाला तरीही मुले घरी आले नव्हते. त्यामुळे सर्वत्र शोधाशोध सुरू झाली.

मोखाडा गाव पालथे घातले तरीही दोघांचा थांगपत्ता लागला नाही. त्यामुळे कुटुंबीय चिंताग्रस्त होते. दरम्यान घरापासून काही अंतरावर असलेल्या भागात असलेल्या डबक्यात एक मुलगा आढळून आला. त्यानंतर दुसऱ्या मुलाचा शोध घेतला असता तो देखील सापडला. दोघांनाही मोखाडा येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. दोन्ही चिमुकल्यांचा अकस्मात मृत्यू झाल्याने कुटुंबीयांवर दुखाचा डोंगर कोसळला आहे.

Intro:मोखाडा येथे पाण्याच्या डबक्यात बुडून दोन चिमुकल्यांचा मृत्यूBody:मोखाडा येथे पाण्याच्या डबक्यात बुडून दोन चिमुकल्यांचा मृत्यू

नमित पाटील,
पालघर, दि.10/8 2019

अनेक दिवसांपासून जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाले तुडुंब भरल्याचे चित्र आहे. मात्र मोखाडा तालुक्यात एका डबक्यात पडून दोन लहानग्यांचा मृत्यू झाल्याची ह्रदयद्रावक घटना घडली आहे. फरहान शाकिर खाटीक(७ ) आणि अरशान अखलाक शेख (७) अशी मृत मुलांची नावे आहेत.

मोखाडा मुख्यरस्त्यावरील मस्जीद परिसरात राहणाऱ्या शेख कुटुंबातीकल अखलाक शेख यांचा मुलगा अरशान त्यांच्याकडे पाहुणा म्हणून आलेले त्यांच्या नातेवाईकांचा मुलगा फरहान हे दोघे गुरुवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास घराबाहेर पडले. हे दोघेही कुठेतरी खेळायला किंवा खाउ आणायला जात असतील असे समजून त्यांना घरातील कोणी हटकले नाही. मात्र रात्री खूप उशीर झाला तरीही ही दोन्ही लहान मुले घरी न परतल्याने घरच्यांनी शोधाशोध सुरू केली. संपूर्ण मोखाडा शहर पालथे घालून झाले तरीही मुले न सापडल्याने घरच्यांची चिंता वाढली. त्यानंतर घरापासुन काही अंतरावर असलेल्या भागात एका डबक्यात यातील एका मुलाचा मृतदेह दिसला यानंतर दुसऱ्याही मुलाचा शोध घेतल्यानंतर तो ही या डबक्यात आढळून आला. या दोन्ही मुलांना ग्रामीण रुग्णालय मोखाडा येथे नेण्यात आल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. दोन्ही लहानग्यांच्या अकस्मात जाण्याने त्यांच्या कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे.

Photo-अरशान अखलाक शेख (७) Conclusion:
Last Updated : Aug 10, 2019, 3:31 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.