ETV Bharat / state

मांडूळ सापांची तस्करी करणाऱ्या दोन जणांना अटक, जप्त केलेल्या सापांची किंमत अडीच कोटी - Snake

पालघरमध्ये मांडूळ सापांची तस्करी करणाऱ्या २ आरोपींना पोलिसांनी अटक केली.

मांडुळाची तस्करी करणाऱ्या आरोपीसह पोलीस
author img

By

Published : May 30, 2019, 9:22 AM IST

पालघर - मांडूळ सापांची तस्करी करणाऱ्या २ आरोपींना नवघर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई करत अटक केली. या मांडूळ सापांची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात सुमारे अडीच कोटी रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

वाजीद हुसेन मोहम्मद युसूफ कुरेशी (४७) आणि शंभू अच्छेलाल पासवान (३९) अशी या आरोपींची नावे आहेत. या दोघांविरोधात नवघर पोलीस ठाण्यात वन्यजीव १९७३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मांडुळाची तस्करी करणाऱ्या आरोपीसह पोलीस

भाईंदर पूर्व साईबाबा फाटक येथे २ व्यक्ती मांडूळ साप विक्रीसाठी येणार असल्याची माहिती नवघर पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे नवघर पोलिसांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची मदत घेऊन याठिकाणी सापळा रचला. बुधवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास एक व्यक्ती मोठी निळ्या रंगाची बॅग घेऊन आला. त्याच वेळी आणखी एक व्यक्ती तेथे आला. यावेळी सापळा रचून बसलेल्या पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे असलेल्या बॅगेची झडती घेतली असता त्यामध्ये २ मांडूळ साप आढळून आले. या मांडूळ सापांची आंतरराष्ट्रीय बाजारात सुमारे अडीच कोटी रुपये इतकी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या सापांचा वापर औषध तयार करण्यासाठी तसेच जादूटोणा करण्यासाठी केला जातो.

पोलीस अधीक्षक डॉ. शिवाजी राठोड, अप्पर अधीक्षक संजयकुमार पाटील आणि उपअधीक्षक शांताराम वळवी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम भालसिंग, सहाय्यक निरीक्षक प्रमोद बडाख आणि टिकाराम थाटकर सह उपनिरीक्षक विजय टक्के, संजय पाटील, प्रशांत वाघ, संदीप भालेराव, निलेश शिंदे, संदिप शिमदे, प्रदिप टक्के, महेश वेल्हे आणि महिला पोलीस सुतार यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Intro:मांडूळ सापांचीची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक

जप्त केलेल्या दोन सापांची किंमत अडीच कोटी रुपये

वाजीद हुसेन मोहम्मद युसूफ कुरेशी (वय ४७) आणि शंभु अच्छेलाल पासवान (वय ३९ ) अटक केलेल्या दोघांची नावे
Body: मांडूळ सापांचीची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक

जप्त केलेल्या दोन सापांची किंमत अडीच कोटी रुपये

वाजीद हुसेन मोहम्मद युसूफ कुरेशी (वय ४७) आणि शंभु अच्छेलाल पासवान (वय ३९ ) अटक केलेल्या दोघांची नावे

नमित पाटील,
पालघर, दि.29/5/2019,

भाईंदर पूर्व येथे सरंक्षित वन्यजीव असणाऱ्या मांडूळ जातीच्या दोन सापांची विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना नवघर पोलीस व स्थानिक गुन्हे शाखने संयुक्त कारवाई करून अटक आली आहे. वाजीद हुसेन मोहम्मद युसूफ कुरेशी (वय ४७) आणि शंभु अच्छेलाल पासवान (वय ३९ ) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. या मांडूळ सापांची आंतरराष्ट्रीय बाजारात सुमारे अडीच कोटी रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
भाईंदर पूर्व साईबाबा फाटक येथे दोन इसम मांडूळ साप विक्रीसाठी येणार असल्याची माहिती नवघर पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे नवघर पोलिसांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची मदत घेऊन याठिकाणी सापळा रचला. दुपारी 3.30 सुमारास एक इसम मोठी निळ्या रंगाची बॅग घेऊन आला. त्याच वेळी आणखी एक इसम तेथे आला व सापळा रचून बसलेल्या पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे असलेल्या बँगेची झडती घेतली असता त्यामध्ये दोन मांडूळ साप आढळून आले. या मांडूळ सापांची आंतरराष्ट्रीय बाजारात सुमारे अडीच कोटी रुपये इतकी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या सापांचा वापर औषध तयार करण्यासाठी तसेच जादूटोणा करण्यासाठी केला जातो.

वाजीद हुसेन मोहम्मद युसूफ कुरेशी (वय ४७) आणि शंभु अच्छेलाल पासवान (वय ३९ ) अशी अटक केलेल्या दोन आरोपींची नावे असून या दोघांविरोधात नवघर पोलीस ठाण्यात वन्यजीव 1973 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधिक्षक डॉ. शिवाजी राठोड, अपर अधिक्षक संजयकुमार पाटील व उपअधिक्षक शांताराम वळवी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम भालसिंग, सहाय्यक निरीक्षक प्रमोद बडाख व टिकाराम थाटकर सह उप निरीक्षक विजय टक्के, संजय पाटील, प्रशांत वाघ, संदीप भालेराव, निलेश शिंदे, संदिप शिमदे, प्रदिप टक्के, महेश वेल्हे व महिला पोलीस सुतार यांच्या पथकाने केली.

Byte- शांताराम वळवी, DYSP मिररोड

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.