नालासोपारा (पालघर) - नालासोपारा पश्चिम स्टेशन परिसरातील साक्षी ज्वेलर्सच्या मालकाची हत्या व लूट करणाऱ्या आरोपींना अटक करण्यात आली आहे. जॉन व अफजल महोम्मद अशी या दोन्ही आरोपींची नावे असून या आरोपींनी २१ ऑगस्ट रोजी साक्षी ज्वेलर्समध्ये सशस्त्र दरोडा टाकून दुकान मालक किशोर जैन यांची हत्या केली होती. दुकानातील दागिने लुटून पळ काढला होता. या घटनेवरून नालासोपारा परिसरातील सोनारांमधून संताप व्यक्त केला जात होता. पोलिसांनी या आरोपींना अटक करण्यासाठी विविध १५ पथके तयार करून त्यांचा शोध घेतला. मात्र गुप्त माहितीदारांच्या मदतीने पोलिसांनी या गुन्ह्यातील दोन्ही आरोपींना अटक केली आहे.
माहिती देतांना पोलीस अधिकारी हे दोन्ही आरोपी कोरोनाकाळात कामधंदा नसल्यामुळे बेकार होते. दोघेही व्यवसायाने इलेक्ट्रिशीयन असून जाॅन याच्यावर मुंबईत दोन गुन्हे दाखल आहेत. तर नालासोपारा येथील मोहम्मद अफजल हा गेल्या एक महिन्यांपासून साक्षी ज्वेलर्सची रेकी करत होता. शनिवारी दोघेही एक खरे व एक खोटे पिस्तूल घेऊन सकाळी नऊच्या दरम्यान साक्षी ज्वेलर्सच्या दुकानाजवळ आले होते. दुकान उघडल्यानंतर संधी साधत त्यांनी दुकानात शिरून दुकानमालक किशोर जैन याच्याकडे लाॅकरची चावी मागीतली. मात्र त्याने ती न दिल्याने त्याचे हात पाय बांधून तसेच सॅलोटेपने तोंड बंद करून त्याच्यावर चाकूने प्राणघातक हल्ला केला. त्यानंतर लाॅकर नेता न आल्याने चांदी घेऊन त्यांनी पलायन केले होते. या घटनेत किशोर जैन यांचा रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला होता.
हेही वाचा - जादूटोणा संशय प्रकरण : शरीरावरील जखमा तर भरतील, पण मानसिक आघाताचे काय?