पालघर - मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे डहाणू तालुक्यातील उर्से येथील दुडीचा धबधबा खळखळून वाहू लागला आहे. हा धबधबा पाहण्यासाठी पर्यटक मोठी गर्दी करत आहेत.
डहाणू तालुक्यातील मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील चारोटी येथून १० किलोमीटर अंतरावर उर्से हे निसर्गरम्य गाव आहे. या गावाच्या मुख्य रस्त्यापासून २० ते २५ मिनिटे डोंगराकडे पायी गेल्यानंतर उर्से धबधबा दिसतो. सध्या पावसामुळे हा धबधबा ओसडूंन वाहत आहे. त्यामुळे पर्यटक धबधब्याचा आणि पावसाचा आनंद लुटण्यासाठी धबधब्यावर गर्दी करत आहेत.