ETV Bharat / state

पालघर : पिकअप व कारची धडक; अपघातात तीन जखमी - पिकअप व कारची धडक

मंगळवारी सकाळी १०च्या सुमारास बांद्रा मुंबई येथून अर्धांगवायू आजार झालेल्या एका रुग्णाला घेऊन कार निघाली होती.

Pickup tempo car accident
पिकअप टेम्पो - कार अपघात
author img

By

Published : Apr 20, 2021, 6:58 PM IST

पालघर - पिकअप टेम्पो व कारची जोरदार धडक होऊन अपघात झाल्याची घटना घडली. ही घटना विरार पूर्वेतील शिरसाड अंबाडी मार्गावरील चांदीप मांडवी वळणावर घडली. या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.

नियंत्रण सुटल्याने अपघात -

मंगळवारी सकाळी १०च्या सुमारास बांद्रा मुंबई येथून अर्धांगवायू आजार झालेल्या एका रुग्णाला घेऊन कार निघाली होती. ही कार वज्रेश्वरी रस्त्यावरील वरील ठिकाणाहून जात असताना समोरून भरधाव येणाऱ्या पिकअपची धडक लागली आहे. पिकअप गाडीचे वळणावर नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला. यामध्ये विजय गणेश रेडकर (६४), गीतांजली विजय रेडकर (३०), व सतीश परब (५२ ) हे जखमी झाले आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.