ETV Bharat / state

Gram Panchayat Election 2022 : पालघर जिल्ह्यात ३४२ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी हजारो अर्ज दाखल - Gram Panchayat Election 2022

पालघर जिल्ह्यात (Gram Panchayat Election in Palghar district) 473 ग्रामपंचायती पैकी 342 ग्रामपंचायतीच्या निवडणुका 16 ऑक्टोबर रोजी होत आहेत. सोमवारी सायंकाळी उशिरापर्यंत आठ तालुक्यातील 342 सरपंच पदासाठी 1049 तर 3490 सदस्यांसाठी 4765 नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आले (applications filed for gram panchayat election) आहेत.

Gram Panchayat Election in Palghar district
ग्रामपंचायत निवडणुक पालघर
author img

By

Published : Sep 28, 2022, 3:36 PM IST

पालघर : पालघर जिल्ह्यात (Gram Panchayat Election in Palghar district) 473 ग्रामपंचायतीपैकी 342 ग्रामपंचायतीच्या निवडणुका 16 ऑक्टोबर रोजी होत आहेत. सोमवारी सायंकाळी उशिरापर्यंत आठ तालुक्यातील 342 सरपंच पदासाठी 1049 तर 3490 सदस्यांसाठी 4765 नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आले (applications filed for gram panchayat election) आहेत. त्यासाठी नामनिर्देशन पत्र भरण्याची मुदत मंगळवार 27 सप्टेंबर पर्यंत जाहीर करण्यात आली आहे, परंतु अखेरच्या दिवशी प्रचंड प्रमाणात नामनिर्देशन पत्र भरण्यासाठी उमेदवार आल्याने रात्री उशिरापर्यंत ऑनलाइन नोंदणी करण्याचे काम जिल्ह्यातील आठही तालुक्यातील निवडणूक विभागात सुरू होते.

Gram Panchayat Election in Palghar district
ग्रामपंचायत निवडणुक पालघर

तालुक्यानिहाय नामनिर्देशन पत्र - जिल्ह्यात सोमवार दिनांक 26 सप्टेंबरपर्यंत डहाणू तालुक्यातील 62 सरपंच पदासाठी 203 तर 718 सदस्यांसाठी 954 नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आले आहेत. तसेच पालघर तालुक्यातील 83 सरपंच पदासाठी 228 नामनिर्देशन पत्र तसेच 831 सदस्यांसाठी १३१७ नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आले. तर तलासरी तालुक्यात 11 सरपंच पदासाठी 41 नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आले असून 171 सदस्यांसाठी 335 नांमनिर्देशन पत्र दाखल झाले आहेत. वसई तालुक्यात 11 सरपंच पदासाठी 13 नामनिर्देशन पत्र तर 119 सदस्यांसाठी 90 नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आले.

वाडा तालुक्यातील 70 सरपंच पदांसाठी 186 नामनिर्देशन पत्र तर 612 सदस्यांसाठी 788 निर्देशन पत्र दाखल करण्यात आले आहेत. विक्रमगड तालुक्यात 36 सरपंच पदांसाठी 122 नामनिर्देशन पत्र असून 382 सदस्यांसाठी 426 नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आले आहेत. तर जव्हार तालुक्यातील 47 सरपंच पदासाठी 149 नामनिर्देशन पत्र आणि 439 सदस्यांसाठी 509 नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आले आहेत, मोखाडा तालुक्यात सरपंच पदासाठी 107 नामनिर्देशन पत्र असून 218 सदस्यांसाठी 343 नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आले आहेत.

निवडणूक कार्यालयामध्ये प्रचंड गर्दी - ग्रामपंचायत निवडणुकीचे नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी जिल्ह्यात शिवसेना काँग्रेस बहुजन विकास आघाडी, भाजपा राष्ट्रवादी काँग्रेस शिंदे शिवसेना गट मार्क्सवादी कम्युनिस्ट जनता दल भूमी सेना मनसे तसेच आदिवासी संघटना आदींनी आपापल्या राजकीय ताकदीप्रमाणे सरपंच व सदस्यत्व निवडीकरता नामनिर्देशन पत्र भरण्यासाठी सर्वच तालुक्यात निवडणूक कार्यालयामध्ये प्रचंड गर्दी केली होती. यामध्ये महिला उमेदवारांनी सरपंच आणि सदस्यत्व नामनिर्देशन भरण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. त्याकरता त्यांना मदत करण्यासाठी या विविध पक्षांचे प्रतिनिधी विविध सायबर कॅफेमध्ये बसून ऑनलाईन अर्ज भरण्याचे काम सकाळी दहा वाजल्यापासून सायंकाळी उशिरापर्यंत करताना दिसत (gram panchayat election applications) होते.

गरीब नागरिकांना अर्जाच्या 'फी'चा मोठा फटका - जिल्ह्यातील सर्वसामान्य गरीब आदिवासी ऑनलाइन निर्देशन पत्र भरण्याबाबत अज्ञान असल्यामुळे प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी खाजगी सायबर कॅफेमध्ये बसून हे नामनिर्देशन पत्र भरण्याच्या काम सुरू होते. त्यामध्ये एका नामनिर्देशन पत्रासाठी सायबर कॅफेमधील एक हजार रुपयाची फी आकारण्यात येत होती. याबाबत कुठल्या ही विभागाचे नियंत्रण नसल्याने अनेक गरीब नागरिकांना त्याचा मोठा फटका बसला आहे. याबाबत नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी पूर्वीप्रमाणेच लिखित अर्ज भरून निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे दिल्याबद्दल त्याबाबत तातडीने काम होत असे. परंतु आता ऑनलाईन अर्ज दाखल करायचे असल्याने याबाबत नाईलाजाने मोठी फी भरावी लागत असल्याची प्रतिक्रिया उमेदवारांकडून ऐकू येत होत्या. तसेच निवडणूक विभागाने यापूर्वी 13 ऑक्टोबर रोजी मतदानाची तारीख जाहीर केली होती. त्यामध्ये बदल करून सोमवारी 26 सप्टेंबर रोजी 16 ऑक्टोबर रोजी मतदान होणार असल्याचे दुरुस्तीचे आदेश काढल्याने, उमेदवारांना निवडणुकीच्या प्रचारासाठी जादा तीन दिवस मिळणार असल्याने अनेक जण खुशीत असल्याचे दिसत (Gram Panchayat Election 2022) होते.

सायबर कॅफेमध्ये तुफान गर्दी - 342 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत अर्ज भरण्याची मुदत 21 ते 27 सप्टेंबर पर्यंत होती. यामध्ये शनिवारी व रविवार या दोन सुट्ट्या आल्याने सोमवार आणि मंगळवारी जिल्ह्यातील पालघर डहाणू तलासरी वसई वाडा विक्रमगड जव्हार मोखाडा तालुक्यात अर्ज भरण्यासाठी प्रचंड गर्दी झाली होती. आज दुपारी तीनपर्यंत अर्ज भरण्याची मुदत असल्याने थेट सरपंच पदासाठी व सदस्य पदासाठी अर्ज भरण्यासाठी आलेल्या उमेदवारांची धावपळ सुरू होती. पालघर येथील सायबर कॅफेमध्ये तुफान गर्दी झाली होती. भरलेला अर्ज पुन्हा तपासून घेण्यासाठी उमेदवारांची धावपळ सुरू असल्याचे चित्र दिसत होते. मतदानाची तारीख 13 वरून 16 तारीख केल्याने अर्ज भरण्याची तारीख पण वाढवायला हवी होती, असा सूर उमेदवारांकडून येत होता.

उमेदवारांची घरपट्टी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भरली - संपूर्ण जिल्ह्यामध्ये मंगळवारी उमेदवारांनी प्रचंड गर्दी केली होती. सर्व ठिकाणी सायबर कॅफे तुडुंब गर्दीने भरले होते. इतके दिवस अर्ज भरण्याची फी पाचशे रुपये होती. ती आज 800 ते हजार रुपये करण्यात आली. बऱ्याच ठिकाणी उमेदवारांनी घरपट्टी भरली नसल्याने राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना त्यांची घरपट्टी ही भरावी लागली. एकंदरीत दिवाळीच्या अगोदर येणारी ही निवडणूक मतदारांसाठी दिवाळी ठरणार (Gram Panchayat Election) आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.