पालघर: तलासरी तालुक्यातील इयत्ता चौथीत शिकणारी 10 वर्षीय मुलगी सकाळी शाळेत जाण्यास निघाली असता मुलगी घरी आली नसल्याने पालकांनी गावात शोधा शोध केली. परंतु मुलगी मिळून न आल्याने पालकांनी तलासरी पोलीस ठाणे गाठत रात्री उशिरा अज्ञात इसमाने मुलीचे अपहरण केल्याचा गुन्हा नोंद केला होता.
या पोलीस पथकाने घेतले परिश्रम: गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक, पालघर, पंकज शिरसाठ, अपर पोलीस अधीक्षक, पालघर यांचे आदेशान्वये संजीव पिंपळे, उपविभागीय पोलीस अधिकारी डहाणु विभाग, यांचे मार्गदर्शनाखाली अजय वसावे, पोलीस निरीक्षक, तलासरी पोलीस ठाणे यांना तपासाबाबत सुचना देण्यात आल्या. त्याअनुषंगाने अजय वसावे, पोलीस निरीक्षक, तलासरी पोलीस ठाणे यांनी वेगवेगळी चार पथके तयार केली.
पोक्सो कायद्यांतर्गत अटक: पथकांनी तांत्रिक पुराव्यांच्या आधारे कोणतेही धागेदोरे नसतांना सखोल व कौशल्यपूर्ण तपास करुन अवघ्या २ तासात संशयित इसम वय ४५ वर्षे, याच्याकडे संबंधित मुलीबाबत चौकशी करण्यात आली. यामध्ये आरोपीने अपहरण केलेल्या मुलीस गुजरात राज्यात घेऊन जाऊन तिच्यावर अतिप्रसंग करुन खून केल्याचे तपासात समोर आले. वरील नमुद गुन्ह्यात आरोपीस अटक करून भादंवि कलम ३०२, ३७६, पोक्सो कायद्या अंतर्गत अधिकची कलमे समाविष्ट करण्यात आले आहेत.
पैशातून वाद आणि हत्या: आरोपी हा बोटीत मासेमारी करिता खलाशी म्हणून जात होता. परंतु खलाशी असताना देवाण घेवाणीतील पैसे दिले नाहीत, म्हणून वारंवार त्यांच्यात खटके उडत होते. याचा मनात राग धरून नराधम दुबळा याने मुलीचे अपहरण केले. त्यानंतर तिला गुजरात राज्यातील भिलाड संजान रोड वरील वनविभागाच्या जंगलाच्या झाडी झुडपात नेऊन जबरदस्तीने लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केली. याबाबत तलासरी पोलिसांनी आरोपीस अटक केली असून अधिक तपास पोलीस करीत आहेत. आरोपीकडून आणखी काही माहिती कळते का या प्रयत्नात पोलीस आहेत.
हेही वाचा: Child Burned by Cigarette: बहिणीने सात वर्षाच्या भावाला दिले सिगारेटचे चटके, गालच जाळला