ETV Bharat / state

Suspected Suicide : आश्रमशाळेतील आदिवासी विद्यार्थिनीची आत्महत्या संशयास्पद चौकशीची मागणी

author img

By

Published : Nov 7, 2022, 2:17 PM IST

वाडा तालुक्यातील परळी आश्रमशाळेतील (in ashram school ) ९ वीत शिकणाऱ्या आदिवासी विद्यार्थीनीने (suicide of tribal student ) राहत्या घरी विष पिऊन आत्महत्या केली. हे प्रकरण संस्थेने दडपले. मात्र या प्रकरणात संस्थेतीलच लोकांचा हात असल्याचा संशय आहे. मुलीचे वडील शंकर यशवंत मालक यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन संशयास्पद आत्महत्येच्या (Suspected suicide) चौकशीची (demands inquiry) मागणी केली आहे.

Suicide of tribal student
आदिवासी विद्यार्थिनीची आत्महत्या

पालघर: वाडा तालुक्यातील परळी आश्रमशाळेतील इयत्ता ९ वी मधे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनीने दि. २० ऑक्टोबर रोजी राहत्या घरी विष पिऊन आत्महत्या केली. हे प्रकरण संस्थेने दडपले. मात्र या प्रकरणात संस्थेतीलच लोकांचा हात आहे, याची माहिती मिळताच मुलीचे वडील शंकर यशवंत मालक यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन मुलीच्या मृत्यूची सखोल चौकशी (demands inquiry) करून गुन्हेगारांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

परळी या गावात माजी खासदार पद्मश्री अण्णासाहेब जाधव यांच्या भारतीय समाज उन्नतीमंडळ या प्रतिष्ठित संस्थेची आश्रम शाळा आहे. या आश्रमशाळे मधे कु. गौरी शंकर मालक , रा. वडवली, पो. गारगांव, ता. वाडा ही विद्यार्थीनी इ. ९ वी मध्ये शिक्षण घेत होती. दिवाळीच्या सुट्टीमध्ये दि.१९ ऑक्टोबर रोजी ती गावी आली व दुसऱ्याच दिवशी दि. २० ऑक्टोबर रोजी तिने विष प्राशन करून आत्महत्या केली.

आत्महत्येबद्दल अधिक चौकशी करता तिच्या वडिलांना असे समजले की, मुलीला आश्रमशाळेच्या मुख्याध्यापकाने वारंवार आपल्या कार्यालयामध्ये बोलून कुठल्यातरी कारणास्तव दबाव टाकला होता. ती घरी आल्यानंतरही दबावाखाली होती. तिच्या आत्महत्येनंतर आश्रमशाळेतील तिचे दप्तर तपासले असता दप्तरामध्ये कु. गौरी हिने मुख्याध्यापकांच्या नावाने लिहिलेली चिठ्ठी मिळाली. चिठ्ठीमध्ये मुख्याध्यापक कु. गौरी हिच्यावर खोटे आरोप करत असल्याचे स्पष्ट होत होते.

ही चिठ्ठी मुख्याध्यापकाने मुलीच्या वडिलांकडे न देता स्वतःकडे ठेवून घेतली व वडिलांना प्रकरण वाढवू नका, मिटवून घ्या, आम्ही तुम्हाला शासनाकडून पैसे मिळवून देऊ असे सांगत होते. हे त्यांचे वागणे संशयास्पद होते, म्हणून त्यांच्यासह या प्रकरणांमध्ये सहभागी असलेल्या व कु. गौरीच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी मुलीच्या वडिलांनी केली आहे. कु. गौरी मालक या अल्पवयीन आदिवासी मुलीला न्याय द्यावा यासाठी आदिवासी विकास संघर्ष समितीने आंदोलनाचा इशारा दिला आहे.

शिवक्रांती संघटनेचे सदस्य शरद पाटील यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देऊन कुमारी गौरी हिला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्याची चौकशी करून गुन्हेगारांना शासन करावे , अशी मागणी केली आहे. त्यांनी गृहमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात, पालघर जिल्ह्यातील आश्रमशाळांमध्ये झालेल्या आत्महत्यांची उदाहरणे नावासह दिली असून दि. १ जुन २०२२ ते दि. २० आक्टोबर २०२२ पर्यंत अवघ्या ४ महिन्यात आश्रमशाळेतील १२ विद्यार्थिनींचा संशयास्पद मृत्यू झाल्याचे म्हणले आहे. आश्रमशाळेतील अल्पवयीन विद्यार्थिनींचे मृत्यू का व कसे होतात? (Why do female students die in the ashram school ) याचीही चौकशी करण्याची मागणी गृहमंत्र्यांकडे केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.