वसई - नालासोपारा मध्ये राहणारा सूर्यभान यादवने नागरी लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेत देशात 488 वा क्रमांकाने उत्तीर्ण होण्याचा बहुमान मिळवला आहे. नालासोपारा मधून पहिला IAS होण्याचा मान त्याने मिळवला असून त्याचे सर्व स्तरातून सद्या कौतुक होत आहे. वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर व नालासोपाराचे आमदार क्षितीज ठाकूर यांनी सुर्यभान यादव याचे कौतुक केले आहे. विरार येथील कार्यालयात सुर्यभान यादव यानी आमदार ठाकूरांची शनिवारी संध्याकाळी भेट घेतली.
नागरी लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षा 2020 चा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेत एकूण 761 उमेदवारांनी यश प्राप्त केले असून ते महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनीही मोठे यश संपादन केले आहे. त्यात नालासोपारा येथील सूर्यभान यादव या विद्यार्थाने 488 वी रँक मिळवून युपीएससी परिक्षेत घवघवीत यश मिळवले आहे.त्याच्या या कामगीरीबद्दल संपूर्ण वसईतून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. नागरी लोकसेवा आयोग 2020 च्या मुख्य परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये एकूण 761 उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये खुल्या प्रवर्गातून 263 तर आर्थिक मागास प्रवर्गातून 86, अन्य मागास प्रवर्गातून 229 तर अनुसूचित जाती 122, अनुसूचित जमाती 61 उमेदवारांनी परीक्षा उत्तीर्ण केली आहे.