ETV Bharat / state

रेती प्रकरणी पोलीस अधीक्षकांची 13 पोलिसांवर कारवाई

author img

By

Published : Sep 29, 2020, 2:53 PM IST

विरार पोलीस ठाणे अंतर्गत मांडवी पोलीस दूरक्षेत्र हद्दीत मोठ्या प्रमाणात रेती उत्खनन होत असताना रेती माफियांविरोधात कोणतीही कारवाई केली नसल्याचा ठपका ठेवत पोलीस अधीक्षकांनी एक पोलीस अधिकारी आणि 12 पोलीस कर्मचारी यांची बदली केली आहे.

action-against-police
पोलीस अधीक्षकांची पोलिसांवर कारवाई

विरार/ पालघर - शनिवारी संध्याकाळी पालघर पोलीस अधीक्षक दत्तात्रेय शिंदे यांनी खर्डी आणि खानिवडे रेतीबंदरावर पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह सापळा रचून छापा टाकला होता. या छाप्यात 152 सक्शन पंप, 1650 ब्रास रेती, 230 बोटी, 1 जेसीबी असा 7 कोटी 90 लाखांचा मुद्देमाल जप्त केला होता. याप्रकरणी विरार पोलिसांना दोषी मानून वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश वराडे आणि सहायक पोलीस निरीक्षक पंडित कल्याणराव मस्के यांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. तर, मांडवी दूरक्षेत्रातील एक पोलीस अधिकारी आणि 12 पोलीस कर्मचारी यांची कसुरीवरून बदली केल्याने पालघर जिल्ह्यातील पोलिसांमध्ये एकच खळबळ माजली आहे.

action-against-police
पोलीस अधीक्षकांची पोलिसांवर कारवाई

गुन्ह्यात जप्त केलेल्या 230 बोटी, 152 सक्शन पंप यांची विल्हेवाट लावण्याबाबत न्यायालयाने निर्देश दिले आहेत. त्याच अनुषंगाने महसूल विभागाने सदर ठिकाणाचे सक्शन पंप आणि बोटी तोडण्याचे व गुन्ह्यात जप्त मुद्देमालाची, साहित्याची विल्हेवाट लावण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. विरार पोलीस ठाण्याचे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश वराडे आणि सहायक पोलिस निरीक्षक पंडित कल्याणराव मस्के यांना विरार पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध रेती उत्खनन होत असल्याचे माहीत असतानाही जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा ठपका ठेवत पोलीस अधीक्षकांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. विरार पोलीस ठाणे अंतर्गत मांडवी पोलीस दूरक्षेत्र हद्दीत मोठ्या प्रमाणात रेती उत्खनन होत असताना त्यांनी रेती माफियांविरोधात कोणतीही कारवाई केली नसल्याचा ठपका ठेवत पोलीस अधीक्षकांनी एक पोलीस अधिकारी आणि 12 पोलीस कर्मचारी यांची बदली केली आहे.

कर्तव्यात कसूर केली म्हणून सहायक पोलीस निरीक्षक पंडित कल्याणराव मस्के यांना तातडीने वसईच्या अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयात संलग्न केले आहे. तसेच पोलीस हवालदार गौतम देवराम तोत्रे, पोलीस नाईक संतोष बाबू धांगडा, तानाजी अजिनाथ जाधव, सुभाष दादाराव शिंदे, भरत आत्माराम गोवारी, महेंद्र किसन पाटील, गजेंद्रसिंग बबनसिंग पाटील, विजय हिंदुराव गुरव, भूषण हरिश्चंद्र पाटील, पोलीस शिपाई नवनाथ दादा शेळके, गोविंद बळीराम मुसळे आणि उत्तम अमृत भोये यांची वसईच्या उपमुख्यालयात बदली करण्यात आली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.