ETV Bharat / state

पालघरमध्ये लाऊड स्पीकर माध्यमातून विद्यार्थी घेत आहे 'शिक्षण' - पालघर जिल्हा परिषद शाळा बातमी

पालघर येथे 'बोलकी शाळा' या उपक्रमाच्या माध्यमातून परवडेल असे ऑफलाईन शिक्षण लाऊड स्पीकर माध्यमातून दिले जात आहे. लायन्स क्लब ऑफ बॉम्बे एअरपोर्ट व दिगंत स्वराज फाउंडेशनच्या या अभिनव उपक्रमाची जोरात चर्चा होत आहे.

students-taking-education-through-loudspeakers-in-palghar
पालघरमध्ये लाऊड स्पीकर माध्यमातून विद्यार्थी घेत आहे 'शिक्षण'
author img

By

Published : Oct 26, 2020, 10:41 PM IST

पालघर - जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना 'बोलकी शाळा' या उपक्रमाच्या माध्यमातून सद्याच्या ऑनलाईन शिक्षणपद्धतीला फाटा देत परवडेल असे ऑफलाईन शिक्षण हे लाऊड स्पीकर माध्यमातून दिले जात आहे. लायन्स क्लब ऑफ बॉम्बे एअरपोर्ट व दिगंत स्वराज फाउंडेशनच्या या अभिनव उपक्रमाची जोरात चर्चा होत आहे.

पालघरमध्ये लाऊड स्पीकर माध्यमातून विद्यार्थी शिक्षण घेत आहे

पालघर जिल्ह्यात लायन्स क्लब ऑफ बॉम्बे एअरपोर्ट व दिगंत स्वराज फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आणि राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक प्रमोद पाटील यांच्या पुढाकाराने हा उपक्रम सफाळ्यातील जिल्हा परिषदेच्या खोरीचापाडा, टेंभीखोडावे, विराथन बुद्रुक, नावजे व लालठाणे या पाच शाळांमध्ये सुरू करण्यात आला आहे. शालेय अभ्यासक्रमाबरोबरच खेळ व संगीत यांचा समावेश आहे. कोरोना काळात अनेक विद्यार्थी मोबाईलद्वारे शिक्षण घेत आहे. पण या शिक्षण पद्धतीत महागडा मोबाईल घेणे जमत नाही. तसेच नेटवर्क नसल्याने अनेक अडचणी येतात. यासाठी गरीब पालकांची आर्थिक परिस्थिती नसल्याने ते परवडत नाही. त्यामुळे जिल्हा परिषद शाळेतील अंगणवाडी तसेच पहिली ते चौथी आणि पाचवी ते सातवी या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी स्पीकर आणि यूएसबी डाटाच्या माध्यमातून 'बोलकी शाळा' या उपक्रमाच्या माध्यमातून अभ्यासक्रम शिकवला जात आहे. सोशल अंतर पाळत विध्यार्थी वर्ग हे समूहाने किंवा दूरवर बसून लाऊड स्पीकरच्या माध्यमातून अध्ययन करीत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.