पालघर - जगभरात असे एकही क्षेत्र नाही, ज्यात महिलांनी आपले कर्तुत्त्व सिद्ध केलेले नाही. आयुष्यात सर्व काही मिळूनही कुरकुरत जगणारी अनेक माणसे या जगात आहेत. मात्र संकटांवर मात करून आनंदी जीवन जगत, इतरांचे जीवन प्रकाशमय करणारी, इतरांना प्रेरणा देणारी माणसंही आहेत. पालघर जिल्ह्याच्या विक्रमगड तालुक्यातील कऱ्हे येथील अपंग असलेल्या कर्तृत्ववान शिक्षिका प्रतिभा हिलीम यांची काहाणी देखील अशीच प्रेरणादायी आहे.

याच दरम्यान त्या आपल्या मूळ गावी म्हणजेच विक्रमगड तालुक्यातील कऱ्हे येथे आल्या. लॉकडाऊन दरम्यान शाळा बंद झाल्या व मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न समोर आला. शाळा सुरु करण्यायोग्य परिस्थिती कधी निर्माण होईल, हेही सांगता येणे कठीण झाले. त्याच दरम्यान सरकारने 'ऑनलाइन’ शिक्षणाचा पर्याय सर्वांसाठी उपलब्ध केला. परंतु पालघरसारख्या आदिवासीबहुल ग्रामीण भागात मोबाइल नेटवर्क, इंटरनेट, पालकांकडे अँड्रॉइड मोबाइल-लॅपटॉप यांची सोय नाही. त्यामुळे अनेक विद्यार्थी हे शिक्षणापासून वंचित आहेत. ही बाब प्रतिमा हिलीम यांच्या लक्षात आली. यानंतर त्यांनी विद्यार्थ्यांना एकत्र करून त्यांची शिकवणी घेण्यास सुरुवात केली.

अपंगत्वावर यशस्वीपणे मात करत त्या कर्हे येथील ऑनलाइन शिक्षणापासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचे काम करत आहेत. इयत्ता 1 ली ते 7 वी पर्यंतच्या साधारणपणे 25 विद्यार्थ्यांना प्रतिभा शिकवतात.
आपल्या हाताच्या बेल्टला पेनाचे टोपण लावून प्रतिभा विद्यार्थ्यांना शिकवतात. अपंगत्वावर मात करून कोरोनाच्या संकट काळात ऑनलाइन शिक्षणापासून वंचित विद्यार्थ्यांसाठी प्रतिभा हिलीम यांचे ज्ञानदानाचे हे कार्य सर्वांंसाठीच प्रेरणादायी आहे.