पालघर- कोरोना व्हायरसचा विळखा राज्यात दिवसेंदिवस वाढत आहे. अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी जीव धोक्यात घालून सेवा देत आहेत. त्यांना कोरोनाचा संसर्क होण्याचा धोक अधिक आहे. त्यामुळे हे कर्मचारी योग्य ती खबरदारी घेत आहेत. मात्र, तरीही यातील काही जणांना कोरोनाचा संसर्ग होत आहे. पालघरमध्ये अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पालघर पोलीस ठाणे यांच्या वतीने वाडा तालुक्यातील पोशेरी येथे एका शाळेच्या इमारतीच्या विशेष कोविड हेल्थ सेंटरचे उभारण्यात आले आहे.
कोरोना संकटाच्या काळात फ्रंट फुटवर काम करणारे डॉक्टर, परिचारिका, सफाई कामगार,आणि पोलीस कर्मचारी यांनाही कोरोनाचा संसर्ग होत आहे. यात पोलीस कर्मचाऱ्याचे प्रमाण अधिक आहे. त्यांच्यावर उपचार करण्यासाठी विशेष सेंटर उभारण्यात आले आहे. वाडा तालुक्यातील पोशेरी येथे हे सेंटर असून त्याचे उद्घाटन पालघर जिल्हाधिकारी कैलास शिंदे, पोलीस अधिक्षक दत्तात्रेय शिंदे, जिल्हा शल्यचिकित्सक कांचन वानेरे, अप्पर पोलीस अधिक्षक विक्रांत देशमुख वाडा तहसीलदार उध्दव कदम, पोलीस निरिक्षक जयकुमार सुर्यवंशी, वाडा ग्रामीण रुग्णालयाचे प्रभारी अधिक्षक प्रदीप जाधव यांच्या उपस्थित करण्यात आले.
पालघर जिल्ह्यात ग्रामीण भागात तसेच वसई विरार महानगरपालिका क्षेत्रात कोरोना विषाणू संसर्ग वाढला आहे. कोरोना बाधितांची एकूण संख्या हजारांच्यावर पोहोचलही आहे. त्यातच अत्यावश्यक सेवेतील कर्मचारीही कोरोनाबाधित आढळत आहेत. त्या पार्श्वभूमीवर हे विशेष कोविड सेंटस उभारण्यात आले आहे.
कोविड सेंटसमधील सुविधा-
- ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर सुविधा
- 50 बेड पोलिसांसाठी आणि 50 बेड इतर रुग्णांसाठी राखीव