ETV Bharat / state

पालघर जिल्हा परिषद,पंचायत समिती निवडणुकीसाठी अंदाजे 62.50 टक्के मतदान

शिवसेना-भाजप युतीमध्ये फूट पडल्यानंतर होणाऱ्या पालघर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये शिवसेना भाजप यांच्यापैकी बलाढ्य कोण हे ठरवण्यासाठी ही निवडणूक दोन्ही पक्षांनी प्रतिष्ठेची केली.

palghar
पालघर जिल्हा परिषद,पंचायत समिती निवडणूकीसाठी अंदाजे 62.50 टक्के मतदान
author img

By

Published : Jan 8, 2020, 8:04 AM IST

पालघर - जिल्हा परिषदेच्या 57 आणि पंचायत समितीच्या 114 जागांसाठी जिल्ह्यात 1312 मतदान केंद्रांवर मंगळवारी मतदान पार पडले. संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत अंदाजे 62.50 मतदान झाले झाले होते.

पालघर जिल्हा परिषद,पंचायत समिती निवडणूकीसाठी अंदाजे 62.50 टक्के मतदान

शिवसेना-भाजप युतीमध्ये फूट पडल्यानंतर होणाऱ्या पालघर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये शिवसेना भाजप यांच्यापैकी बलाढ्य कोण हे ठरवण्यासाठी ही निवडणूक दोन्ही पक्षांनी प्रतिष्ठेची केली. एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या पालघरमध्ये भाजप आपले अस्तित्व टिकविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, बहुजन विकास आघाडी या पक्षांसाठीही ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरली आहे.

हेही वाचा - पालघरमध्ये राज ठाकरे झळकले भाजपच्या बॅनरवर!

भाजपने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली असून शिवसेनेपेक्षा जिल्ह्यात वर्चस्व निर्माण करण्यासाठी वेगवेगळी रणनीती आखल्याचे दिसून आले. काही तालुक्यांमध्ये बहुजन विकास आघाडी, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या पक्षांमध्ये स्थानिक पातळीवर आघाडी झाली आहे. परंतु, जिल्हास्तरावर कोणतीही अधिकृत आघाडी झाली नसल्याचे चित्र या निवडणुकीत दिसून आले. त्यामुळे स्थानिक मुद्द्यांवर निवडणूक लढली जात असून या निवडणुकीत होणाऱ्या मतविभागणीचा लाभ कोणाला मिळतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

हेही वाचा - पालघर जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात

2015 साली पालघर जिल्हा निर्मितीनंतर प्रथमच झालेल्या जिल्हा परिषदेच्या 57 जागांवर भाजपचे 21, शिवसेना 15, बविआ 10, माकप 5, राष्ट्रवादी 4, काँग्रेस 1, अपक्ष 1 असे राजकीय बलाबल होते. मतदारांनी उमेदवारांचे भवितव्य मतपेटीतद्वारे व्यक्त केले असून पालघर जिल्हा परिषदेवर कोणाचे वर्चस्व प्रस्थापित होते, हे उद्या ८ जानेवारीला होणाऱ्या मतमोजणीनंतर समोर येणार आहे.

Intro:पालघर जिल्हा परिषद 57 आणि पंचायत समितीच्या 114 जागांसाठी अंदाजे 62.50 टक्के मतदान; उद्या मतमोजणीBody:     पालघर जिल्हा परिषद 57 आणि पंचायत समितीच्या 114 जागांसाठी अंदाजे 62.50 टक्के मतदान 

नमित पाटील,
पालघर, दि.

       पालघर जिल्हा परिषदेच्या 57 आणि पंचायत समितीच्या 114 जागांसाठी जिल्ह्यात 1312 मतदान केंद्रांवर आज मतदान पार पडले असून  संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत अंदाजे 62.50 मतदान झाले असून ही टक्केवारी वाढण्याची शक्यता आहे.

       शिवसेना-भाजप युतीमध्ये फूट पडल्यानंतर होणाऱ्या पालघर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये शिवसेना व भाजप यांच्यापैकी बलाढय़ कोण हे ठरवण्यासाठी ही निवडणूक दोन्ही पक्षांनी प्रतिष्ठेची केली. एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या पालघर भागात भाजप आपले अस्तित्व टिकविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, बहुजन विकास आघाडी या पक्षांसाठीही ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरली आहे.

     भाजपने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली असून शिवसेनेपेक्षा जिल्ह्यात वर्चस्व निर्माण करण्यासाठी वेगवेगळी रणनीती आखल्याचे दिसून आले आहे.

    काही तालुक्यांमध्ये बहुजन विकास आघाडी व राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या पक्षांमध्ये स्थानिक पातळीवर आघाडी झाल्याचे दिसून आले असले तरी जिल्हास्तरीय कोणतीही अधिकृत आघाडी झाली नसल्याचे चित्र या निवडणुकीत दिसून आले. त्यामुळे स्थानिक मुद्दय़ांवर निवडणूक अधिकतर लढली जात असून अधिकतर होणाऱ्या तिरंगी व चौरंगी लढतीमध्ये होणाऱ्या मतविभागणीचा लाभ कोणाला मिळतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

   2015 साली पालघर जिल्हा निर्मितीनंतर प्रथमच झालेल्या  जिल्हा परिषदेच्या  57 जागांवर भाजपचे 21, शिवसेना 15, बविआ 10, माकप 5, राष्ट्रवादी 4, काँग्रेस 1, अपक्ष 1 असे राजकीय बलाबल होते. मतदारांनी उमेदवारांचे भवितव्य मतपेटीतद्वारे व्यक्त केले असून पालघर जिल्हा परिषदेवर कोणाचे वर्चस्व प्रस्थापित होते हे उद्या ८ जानेवारी रोजी निवडणुक निकालादरम्यान समोर येणार आहे. 

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.