पालघर - पालघर विधानसभा मतदार संघावर भगवा फडकला आहे. महायुतीचे शिवसेना उमेदवार श्रीनिवास वणगा यांचा येथे विजय झाला आहे. महाआघाडीकडून काँग्रेसचे योगेश नम यांचा वणगा यांनी दारुण पराभव केला.
विजयी उत्सव साजरा न करता सध्या अवकाळी पावसाच्या कचाट्यात सापडलेल्या बळीराजाला आर्थिक मोबदला देण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करणार असल्याच श्रीनिवास यांच पालघरवासियाना आश्वासन दिले. तर वाढवण बंदराच्या बाबतीत जनतेच्या बाजूने राहणार असल्याचे श्रीनिवास वणगा यांनी सांगितलं.