ETV Bharat / state

School Student Cabinet Digital Voting Process : कर्दळ जि.प. शाळेत शालेय मंत्रिमंडळ निवडणूक मतदान प्रक्रिया - जिल्हा परिषद कर्दळ शाळा

पालघरच्या (Palghar) जिल्हा परिषद कर्दळ शाळेतील (Z P Kardal School ) शिक्षकांनी शालेय विद्यार्थी मंत्रिमंडळ डिजिटल मतदान प्रक्रिया (School Student Cabinet Digital Voting) प्रत्यक्ष EVM द्वारे म्हणजेच EVM यंत्र असलेल्या मोबाईल एप्लिकेशन्द्वारे ऑनलाईन पद्धतीने घेतली. शाळेतील सर्व शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन प्रत्यक्ष निवडणुकांच्या धरतीवर नियोजनबद्ध राबविलेल्या या प्रक्रियेत निवडून आलेल्या विद्यार्थी प्रतिनिधींचा जाहीरपणे शाळेत शपथविधी झाला.

Z P Kardal School
जिल्हा परिषद कर्दळ शाळा
author img

By

Published : Jul 20, 2022, 6:59 PM IST

Updated : Jul 20, 2022, 8:59 PM IST

पालघर: (Palghar) जिल्हा परिषद शाळा कर्दळ (Z P Kardal School ), ही सफाळे परिसरातील उपक्रमशील शाळा असून, या शाळेत शिक्षकांनी शालेय विद्यार्थी मंत्रिमंडळ डिजिटल मतदान प्रक्रिया (School Student Cabinet Digital Voting) प्रत्यक्ष EVM द्वारे म्हणजेच EVM यंत्र असलेल्या मोबाईल एप्लिकेशन्द्वारे ऑनलाईन पद्धतीने घेतली. शाळेतील सर्व शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन प्रत्यक्ष निवडणुकांच्या धरतीवर नियोजनबद्ध राबविलेल्या या प्रक्रियेत निवडून आलेल्या विद्यार्थी प्रतिनिधींचा जाहीरपणे शाळेत शपथविधी झाला.

विद्यार्थी प्रतिक्रीया

शालेय विद्यार्थी मंत्रिमंडळ डिजिटल मतदान प्रक्रिया 2022 : कर्दळ शाळेत उपक्रमांचा शनिवार म्हणून रंगलेल्या 'शालेय विद्यार्थी मंत्रिमंडळ डिजिटल मतदान प्रक्रिया 2022' या निवडणुकीची धामधूम होती. सर्व उमेदवार आपापल्या चिन्हासह प्रचार कार्यात गुतंले होते. शनिवारी सकाळपासून शाळेत पुन्हा धामधूम होती. मतदान प्रतिनिधी, मतदार अधिकारी, सुरक्षा रक्षक, केंद्राध्यक्ष यांसह मुख्य निवडणूक अधिकारी, निवडणूक प्रशिक्षण अधिकारी, अशा सगळ्यांनी ऑनलाईन ईव्हीएम निवडणुक प्रक्रियेच्या यशस्वीतेसाठी अथक परिश्रम घेतले. विशेष म्हणजे त्या दिवशी शाळेतील उपस्थित एकूण 150 विद्यार्थी मतदारांनी प्रत्यक्ष मतदानात सहभाग नोंदवला. त्यात निवडलेल्या शालेय मंत्रिमंडळाचा निकाल निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सोपविला. मतमोजणी अधिकाऱ्यांनी मतदान विद्यार्थी उमेदवारांच्या प्रतिनिधी समोर निकाल जाहीर केला. त्यानंतर त्यांचा शपथविधी झाला.

दप्तर मुक्त शनिवार उपक्रम : पाठ्यपुस्तकाच्या चाकोरी बाहेर जाऊन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने तसेच अभ्यासक्रमाशिवाय प्रत्यक्ष अनुभव देणारा तंत्रज्ञानवाद रुजवण्यासाठी दप्तर मुक्त शनिवार उपक्रमांतर्गत ईव्हीएम मोबाईल अप्लिकेशनचा वापर झाला. तत्पूर्वी निवडणूक आयोगाच्या अधिसूचनेनुसार निवडणुकीचा कार्यक्रम वेळापत्रक जाहीर केले गेले. मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून मुख्याध्यापिका छाया विजय ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली राबवलेल्या उपक्रमात निवडणूक प्रशिक्षण अधिकारी राजन गरुड, नोडल ऑफिसर आरती संखे, झोनल ऑफिसर कल्पेश पाटील. केंद्राध्यक्ष उषा स्वामी, मतमोजणी अधिकारी स्वप्नाली पाटील, मतदान अधिकारी - कनिष्का कुडू इ.६ वी, शर्वरी कुंदन हातोडे, चंपा धनसिंह मेढा,नैतिक बुजड, इ.७वी. सुरक्षारक्षक म्हणून सोनू गुड्डू वर्मा इ.७ वी प्रणित वाढाण इ.६ वी या सर्वांनी दिलेल्या जबाबदारी प्रमाणे आपापली कामे चोखपणे पार पाडली. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती कर्दळचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व सदस्य या अभूतपूर्व उपक्रमात आवर्जून उपस्थित होते. शालेय विद्यार्थी मंत्रिमंडळ निवडणूक ही ईव्हीएम मशीनद्वारे केली व त्यासाठी होणारे प्रत्यक्ष नियोजन जिल्हा परिषद शाळा कर्दळ येथील शिक्षक व विद्यार्थ्यांनी यशस्वीपणे पार पाडले.

हेही वाचा : Dope Test : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेपूर्वी भारताला मोठा धक्का; धावपटू धनलक्ष्मीसह दोन खेळाडू डोप चाचणीत नापास

Last Updated : Jul 20, 2022, 8:59 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.