ETV Bharat / state

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर अंबोली येथे माकप आणि कष्टकरी संघटनेचा रास्ता रोको - Trade union RASTAROKO

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर पालघर मधील अंबोली येथे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि कष्टकरी संघटनेमार्फत विविध मागण्यांसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे.

Marxist Communist Party
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि कष्टकरी संघटना
author img

By

Published : Nov 26, 2020, 2:15 PM IST

पालघर - मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर पालघरमधील अंबोली येथे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि कष्टकरी संघटनेमार्फत विविध मागण्यांसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे. कार्यकर्त्यांनी हा महामार्ग रोखून धरला असून यामुळे दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली आहे. महामार्गावर आंबोली येथे उड्डाणपूल करा, प्रत्येकाला रेशनिंग दिल गेलं पाहिजे, भरमसाठ वीज दरवाढ रद्द करा अशा विविध मागण्या करत रास्तारोको करण्यात आला आहे.

भारतीय कामगार संघटनेच्या (सीआयटीयू) कामगारांनी केंद्राच्या नवीन कामगार व कृषी कायद्यांच्या विरोधात देशव्यापी आंदोलन छेडले आहे. देशात विविध ठिकाणी रास्तारोको आणि तीव्र आंदोलन करण्यात येत आहेत. पश्चिम बंगालमध्ये कम्युनिस्ट पक्षांनी जादवपूर येथे रेल्वे रुळावर उतरून आंदोलन केले. भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी - लेनिनिस्ट) लिबरेशन, माकप आणि कॉंग्रेस सदस्यांनी रेल्वे रोखली.

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि कष्टकरी संघटना आंदोलन

मोदी सरकारविरोधात कामगार संघटनांचे देशव्यापी आंदोलन

सेंट्रल ट्रेड युनियनच्या एकदिवसीय संपात बँक कर्मचारी संघटना आज सहभागी होणार आहेत. त्यामुळे देशभरातील बँकिंग सेवा बंद राहतील. सेंट्रल ट्रेड युनियनने नवीन तीन कामगार कायद्याविरोधात गुरुवारी संप पुकारला आहे. बँकेच्या कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता असल्याचे आयडीबीआय आणि बँक ऑफ महाराष्ट्राने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत म्हटले आहे.

ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन (एआयबीईए), ऑल इंडिया बँक ऑफसर्स असोसिएशन (एआयबीओए) आणि बँक एम्प्लॉईज फेडरेशन ऑफ इंडिया (बीईएफआय) या संघटना संपात सहभागी आहेत.

हेही वाचा - अत्यावश्यक सेवा देणाऱ्या महानगरपालिका कर्मचाऱ्यांचा संपात सहभाग नाही

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.