ETV Bharat / state

युनिसेफ, संपर्क या संस्थेकडून पालघर जिल्ह्यातील 6 मतदारसंघातील प्रश्नांचा आढावा

युनिसेफ आणि संपर्क संस्था, मुंबई यांच्या माध्यमातून पालघर जिल्ह्यातील 6 मतदारसंघातील आमदारांनी विधिमंडळात विचारलेल्या प्रश्नांचा आढावा घेण्यात आला आहे.

विधानसभा
author img

By

Published : Sep 21, 2019, 7:23 PM IST

पालघर - जिल्ह्यातील 6 मतदारसंघातील आमदारांनी विधिमंडळात विचारलेल्या प्रश्नांचा आढावा युनिसेफ आणि संपर्क संस्था, मुंबई यांच्या माध्यमातून घेण्यात आला. त्या अनुषंगाने मतदारसंघातील विविध समस्या आमदार यांच्या सोबत चर्चा, निवेदनाद्वारे सोडविण्यासाठी पालघर जिल्हा आमदार संवाद मंच स्थापन करण्यात आला आहे. या संवाद मंचाचे संतोष पाटील जिल्हा प्रतिनिधित्व करतात. तसेच या संवाद मंचात आजी-माजी सभापती, शेतकरी वर्ग, विविध सामाजिक स्तरावरील व्यक्तींचा यात समावेश आहे.

हेही वाचा - पालघरमध्ये श्रीनिवास वनगांच्या प्रश्नावर आदित्य ठाकरेंचा काढता पाय

जिल्ह्यात वसई-विरार विधानसभा, नालासोपारा, बोईसर, डहाणू, पालघर, विक्रमगड हे 6 विधानसभा मतदारसंघ आहेत. संवाद मंचाकडून मतदारसंघातील विविध समस्या तसेच बालहक्क संरक्षण समिती स्थापन करणे व बालविवाह विरोधी कायदा, असे विविध विषय आमदार व स्थानिक स्वराज्य संस्थेला निवेदन देवून तो मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

जिल्ह्यातील डहाणू विधानसभा मतदारसंघातील आमदार पास्कल धनारे यांनी अधिवेशन काळात सर्वाधिक प्रश्न उपस्थित केले आहेत. जिल्ह्यातून सन 2014 ते 18 या काळातील सर्व 13 अधिवेशने (एकूण दिवस 198), त्यातील अर्धा तास चर्चा, लक्षवेधी सूचना व तारांकित प्रश्न असे एकूण 148 प्रश्न विचारले गेले. जिल्ह्यातून आदिवासीविषयक एकूण 18 प्रश्न मांडले गेले. धनारे यांनी सर्वाधिक 50 प्रश्न विचारले. अभ्यासविषयांमध्ये पाणी या विषयावर सर्वाधिक 3 प्रश्न त्यांनीच विचारले. घोटाळे-गैरव्यवहारविषयक एकूण 42 प्रश्न विचारले गेले. त्यापैकी सर्वाधिक 26 पास्कल धनारे यांनी मांडले.

हेही वाचा - पालघर विधानसभा आढावा - आघाडीचे सेनेसमोर आव्हान; सेना गड राखणार का?

आरोग्यविषयक सर्वाधिक 3 प्रश्न प्रत्येकी आमदार विलास तारे आणि हितेंद्र ठाकूर यांनी विचारले. शिक्षण आणि शेतीविषयक सर्वाधिक 3 प्रश्न आमदार विलास तारे यांनी उपस्थित केले. तसेच, आमदार हितेंद्र ठाकूर यांनी पाणी या विषयावर सर्वाधिक 3 प्रश्न मांडले. तर सर्वात कमी 9 प्रश्न आमदार कृष्णा घोडा यांनी विचारले. जिल्ह्यातून, महिलाविषयक आणि धोरणविषयक प्रश्न उपस्थित केले गेले नाहीत.

वर्गवारीत मोजल्या न गेलेल्या प्रश्नांचे विषय पुढीलप्रमाणे -

समुद्रकिनारी बांधलेले धूप प्रतिबंधक बंधारे निकृष्ट दर्जाचे असल्याबाबत, दमण बनावटीच्या दारु आणि बिअर बॉटलचे झाकण बदलून दारु विकणाऱ्या टोळीला केलेली अटक, वसई तालुक्यात मंजूर झालेली पोलीस ठाणे सुरू करण्याबाबत, जिल्ह्यातील तानसा, वैतरणा, सूर्या नदीपात्रातील वाळू उपसा, तारापूर अणुऊर्जा केंद्रामुळे बाधित झालेल्यांचे पुनर्वसन, आदिवासींच्या जमिनींबाबतचे गैरव्यवहार, असे प्रश्न तर सर्वाधिक दिवस उपस्थित राहाणारे आमदार पास्कल धनारे आहेत. हा विधिमंडळातील आढावा युनिसेफ आणि संपर्क संस्थेकडून घेण्यात आला.

Intro:विधिमंडळातील अधिवेशन काळातील
पालघर जिल्ह्य़ातील मतदारसंघातील प्रश्नांचा आढावा.
सर्वाधिक प्रश्न उपस्थित करणारे डहाणू विधानसभा मतदारसंघातील आमदार पास्कल धनारे

पालघर (वाडा)संतोष पाटील

पालघर जिल्ह्यात सहा विधानसभा मतदारसंघ आहेत .वसई-विरार विधानसभा, नालासोपारा, बोईसर ,डहाणू, पालघर ,विक्रमगड या मतदारसंघातील आमदारांनी विधिमंडळात विचारलेल्या प्रश्नांचा आढावा युनिसेफ आणि संपर्क संस्था मुंबई यांच्या माध्यमातून घेण्यात आला.त्या अनुषंगाने मतदारसंघातील विवीध समस्या आमदार यांच्या सोबत चर्चा ,निवेदनाद्वारे सोडविण्यासाठी पालघर जिल्हा आमदार संवाद मंच ही स्थापण्यात आला आहे.या संवाद मंचाचे संतोष पाटील जिल्हा प्रतिनिधित्व करतात.तसेच या संवाद मंचात आजी माजी सभापती,शेतकरी वर्ग ,विवीध सामाजिक स्तरावरील व्यक्तींचा यात समावेश आहे. यात संवाद मंचाकडून येथील विवीध समस्यांबाबत आणि बालहक्क संरक्षण समिती स्थापन करणे व बालविवाह विरोधी कायदा असे विवीध विषय आमदार व स्थानिक स्वराज्य संस्थेला निवेदन देवून मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
या पालघर जिल्ह्य़ातील डहाणू विधानसभा मतदारसंघातील आमदार पास्कल धनारे यांनी अधिवेशन काळात सर्वाधिक प्रश्न उपस्थित केले आहेत.
सन २०१४ ते १८ या काळातील सर्व १३ अधिवेशने (एकूण दिवस १९८), त्यातील अर्धा तास चर्चा, लक्षवेधी सूचना व तारांकित प्रश्न पालघर जिल्ह्यातून एकूण १४८ प्रश्न विचारले गेले. हा आदिवासीबहुल जिल्हा. जिल्ह्यातून आदिवासीविषयक एकूण १८ प्रश्न मांडले गेले.
आमदार पास्कल धनारे यांनी सर्वाधिक ५० प्रश्न विचारले. अभ्यासविषयांमध्ये पाणी या विषयावर सर्वाधिक ३ प्रश्न त्यांनीच विचारले. घोटाळे-गैरव्यवहारविषयक एकूण ४२ प्रश्न विचारले गेले. त्यापैकी सर्वाधिक २६ पास्कल धनारे यांनी मांडले.
आरोग्यविषयक सर्वाधिक ३ प्रश्न प्रत्येकी आमदार विलास तारे आणि हितेंद्र ठाकूर यांनी विचारले. शिक्षण आणि शेतीविषयक सर्वाधिक ३ प्रश्न आमदार विलास तारे यांनी उपस्थित केले. तसेच, आमदार हितेंद्र ठाकूर यांनी पाणी या विषयावर सर्वाधिक ३ प्रश्न मांडले. सर्वात कमी, ९ प्रश्न विचारणारे आमदार कृष्णा घोडा.
जिल्ह्यातून, महिलाविषयक आणि धोरणविषयक प्रश्न उपस्थित केले गेले नाहीत.
वरील वर्गवारीत मोजल्या न गेलेल्या प्रश्नांचे विषय सर्वसाधारणपणे पुढीलप्रमाणे: समुद्रकिनारी बांधलेले धूपप्रतिबंधक बंधारे निकृष्ट दर्जाचे असल्याबाबत, दमण बनावटीच्या दारु आणि बिअर बॉटलचे झाकण बदलून दारु विकणा-या टोळीला केलेली अटक, वसई तालुक्यात मंजूर झालेली पोलीस स्टेशन सुरु करण्याबाबत, जिल्ह्यातील तानसा, वैतरणा, सूर्या नदीपात्रातील वाळूउपसा, तारापूर अणुऊर्जा केंद्रामुळे बाधित झालेल्यांचं पुनर्वसन, आदिवासींच्या जमिनींबाबतचे गैरव्यवहार असे प्रश्न तर
सर्वाधिक दिवस उपस्थित राहाणारे आमदार पास्कल धनारे आहेत.हा विधिमंडळातील आढावा युनिसेफ आणि संपर्क संस्थेकडून घेण्यात आला आहे.                                                                                           Body:Plaease Logo use Conclusion:News

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.