पालघर - जिल्ह्यातील पालघर-वाडा-देवगाव या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सध्या वाडा शहरात सुरू आहे. यासाठी रुंदीकरणाच्या कामात अडथळा येणारा अतिक्रमण भाग हा सार्वजनिक बांधकाम व पोलीस कर्मचारी यांच्या उपस्थितीत जेसीबीने काढण्यात येत आहे. या रस्त्याचे रुंदीकरण 16 मीटर करण्यात येत असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे येथून ग्रामीण भागातील प्रवाशांना होणारा वाहतुकीचा अडथळा कमी होणार आहे. मात्र, या रुंदीकरणावर नाराज असलेले काही व्यापारी वर्ग विरोध करत आहेत.
दरम्यान, याबाबत वाडा तहसीलदार यांच्यासोबत चर्चा सुरू आहे. यावर काय तोड्गा निघतोय हे पाहणे मह्त्वाचे आहे. या रुंदीकणासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जिल्ह्यातील पालघर - वाडा - देवगाव या रस्त्याचे रुंदीकरणाचे काम पावसाळ्यापूर्वी हाती घेण्यात आले होते. पण, हे काम संथगतीने सुरू असल्याची ओरड प्रवासी करत आहेत.
आज या रस्त्यावरील अतिक्रमण बांधकाम हे पाडण्यात येत आहे. काही महिन्यांपूर्वी या कामाला येथील व्यापारी संघटनेने केला होता. तसेच व्यापारीवर्गाने दुकाने बंद करून आपला विरोध व्यक्त केला होता. तर, कारवाई ही सुरू करण्यात आली आहे. वाडा बसस्थानक ते परळी नाका या दरम्यान रुंदीकरणात अतिक्रमित जागेतील अडथळा काढण्यात येत आहे. हे रुंदीकरण कमी करावे अशी व्यापारी वर्गाची मागणी आहे. यावर बांधकाम विभाग, व्यापारी आणि तहसीलदार उद्धव कदम यांच्यात सद्या चर्चा सुरू आहे.