ETV Bharat / state

rakesh tikait एमएसपीवर निर्णय होत नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरुच राहील- राकेश टिकैत - farmers agitation to continue till MSP

बिरसा मुंडा यांच्या 147 व्या जयंतीनिमित्त पालघरमध्ये आज भूमी सेना, आदिवासी एकता परिषदेच्या पुढाकाराने जयंती उत्सव साजरा करण्यात आला. यानिमित्त पालघर रेल्वे स्टेशन ते जिल्हाधिकारी कार्यालय अशी रॅली काढण्यात आली होती. या उत्सवाला राकेश टीकैत (Rakesh Tikait ) पालघरमध्ये (Rakesh Tikait in Palghar for program) उपस्थित होते.

राकेश टिकैत
राकेश टिकैत
author img

By

Published : Nov 19, 2021, 10:26 PM IST

Updated : Nov 19, 2021, 10:48 PM IST

पालघर - केंद्र सरकारने तिन्ही कृषी कायदे ( repealing agricultural laws) मागे घेतले आहेत. हे शेतकऱ्यांचे यश असल्याचे मत शेतकरी नेते राकेश टीकैत यांनी व्यक्त केले आहे. तर एमएसपीवर निर्णय होत नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरुच राहील, असा राकेश टीकैत यांनी इशारा दिला. ते एका कार्यक्रमात बोलत होते.

बिरसा मुंडा यांच्या 147 व्या जयंतीनिमित्त पालघरमध्ये आज भूमी सेना, आदिवासी एकता परिषदेच्या पुढाकाराने जयंती उत्सव साजरा करण्यात आला. यानिमित्त पालघर रेल्वे स्टेशन ते जिल्हाधिकारी कार्यालय अशी रॅली काढण्यात आली होती. या उत्सवाला राकेश टीकैत (Rakesh Tikait ) पालघरमध्ये (Rakesh Tikait in Palghar for program_ उपस्थित होते.

हेही वाचा-Farm Laws Repealed : केंद्र सरकारने रद्द केलेले तीन कृषी कायदे आणि काय होता शेकऱ्यांचा आक्षेप? वाचा...

भाजपचा उतरता क्रम पाहता मोदी सरकारने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेतला निर्णय
राकेश टिकैत म्हणाले, की सरकारने कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र जोवर संसदेत याबाबत निर्णय होत नाही, तोवर आंदोलन मागे घेण्यात येणार नाही. त्याचबरोबरीने जोपर्यंत एमएसपीवर निर्णय होत नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांचं आंदोलन सुरुच राहिल, असा इशाराही टीकैत यांनी यावेळी दिला.

मएसपीवर निर्णय होत नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरुच राहील

हेही वाचा-Farm Laws Repealed : 'अन्नदात्यानं सत्याग्रह करून अहंकाराचं डोकं खाली झुकवलं'; राहुल गांधींचे टि्वट

मोदी सरकारला लगावला टोला-

पुढे राकेश टिकैत (Rakesh Tikait on privatization) म्हणाले, की मोदी सरकार खासगीकरणावर जास्त भर देत आहे. सध्या होणाऱ्या निवडणुकांमध्ये भाजपचा उतरता क्रम पाहता मोदी सरकारने निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेतल्याचा टोला यावेळी टीकैत यांनी मोदी सरकारला (rakesh tikait slammed Modi gov in Palghar) लगावला. कायदे मागे घेण्याची घोषणा केली. मात्र, त्यावर चर्चा होऊन निर्णय होईल. जोपर्यंत समाधान होणार नाही, तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

हेही वाचा-Farm Laws Repeal : शेतकरी आंदोलकांचा केंद्र सरकारला झुकवण्यापर्यंतचा प्रवास...

शेतकऱ्यांना पाकिस्तानी आणि खलिस्तानी म्हटले हे कसं विसरुन चालेल-
पुढे राकेश टिकैत म्हणाले, की शेतकऱ्यांच्या हितासाठी व हक्कांसाठी देशात 'संयुक्त मोर्चा' लढा देईल. दिल्ली सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पाकिस्तानी आणि खलिस्तान म्हटले हे कसे विसरून चालेल, असे टीकैत म्हणाले. येत्या 28 तारखेला आम्ही मुंबईत मध्ये येणार आहोत. तुम्ही आवाज दिला तर दिल्लीत जेवढे ट्रॅक्टर आहेत ते सर्व येथे येतील, असे देखील राकेश टीकैत यावेळी म्हणाले.

पंतप्रधान मोदींनी नागरिकांची मागितली माफी-

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी (PM Modi on three farm laws) आज वादग्रस्त असलेले तिन्ही कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला संबोधित करताना याबाबतची घोषणा केली. तसेच आम्ही शेतकऱ्यांना या कायद्याबद्दल समजून सांगण्यात कमी पडलो, त्या बद्दल देशाची माफी मागतो, असेही ते म्हणाले. मी देशवासियांची माफी मागतो. शेतकऱ्यांना कायदे समजून सांगण्यात आमचे प्रयत्न कमी पडले. आज गुरु नानक प्रकाशाचा पवित्र सण आहे. त्यामुळे आज तीन कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संसद या महिन्याच्या अखेरीस सुरू होणाऱ्या अधिवेशनात तीनही कृषी कायदे मागे घेण्याची प्रक्रिया सुरू करेल, असे मोदी म्हणाले.

Last Updated : Nov 19, 2021, 10:48 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.