पालघर - टेंभोडे येथे राहणारे राकेश सुभाष पाटील यांच्या घरगुती गणपतीचं यंदाचं बाराव वर्ष असून, त्यांनी ऑक्सिजन प्लांटची प्रतिकृती उभारली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन अभावी अनेक नागरिकांना आपला प्राण गमवावा लागला. याच पार्श्वभूमीवर ऑक्सीजन प्लांटचा देखावा साकारला आहे.
ऑक्सिजन प्लांटमध्ये रुग्णांसाठी लागणारा कशाप्रकारे तयार केला जातो याची माहिती या देखाव्याच्या माध्यमातून दिली आहे. ऑक्सीजन प्लांटमध्येच गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली आहे. वृक्ष हेच आपल्याला कायमस्वरूपी ऑक्सिजन देत असल्याने प्रत्येकाने किमान एक झाड लावून पुढील पिढीसाठी पर्यावरण संवर्धन करा, झाडे लावा झाडे जगवा, कोरोना नियमांचे पालन करा असा सामाजिक संदेश टेंभोडे येथील राकेश सुभाष पाटील यांनी आपल्या घरगुती गणेशोत्सवाच्या देखाव्यातून दिला आहे.
हेही वाचा - राज्याचे महाधिवक्ता कुंभकोणी यांच्या कार्यप्रणालीवर नाना पाटोलेंचा संशय