ETV Bharat / state

धक्कादायक : प्रॉपर्टीच्या वादातून आली नोटीस, मुलाने केले बापावर कोयत्याने वार - boy struck father with sharp weapon

पालघर जिल्ह्यातील विरारमध्ये मुलाने जन्मदात्या बापावर धारदार शस्त्राने वार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

Property dispute boy struck father with sharp weapon
मुलाने वडिलांवर धारदार शस्त्राने वार केले
author img

By

Published : Mar 3, 2020, 10:51 AM IST

पालघर - विरारमध्ये बाप आणि मुलाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. विरार पश्चिम येथील डोंगर पाडा येथे परशुराम गोविंद पाटील यांच्यावर त्यांच्या राहत्या घरी मुलाने कोयत्याने वार केले. प्रॉपर्टीच्या वादातून परशुराम पाटील (73) यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला असल्याचे नातेवाईकांनी सांगितले आहे.

विरारमध्ये मुलाने जन्मदात्या बापावर धारदार शस्त्राने वार केल्याची धक्कादायक घटना घडली...

हेही वाचा... अल्पवयीन मुलीच्या लग्नात पोहोचले पोलीस; कराडच्या निर्भया पथकाने रोखला बालविवाह

सोमवारी सकाळी परशुराम पाटील हे आपल्‍या बागेत फुले तोडण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांचा मोठा मुलगा किरण पाटील याने त्यांच्यावर कोयत्याने वार केले. यावेळी परशुराम यांनी आरडाओरडा केला. त्यावेळी त्यांचा नातु आणि पत्नी घरातून बाहेर आले असता, त्यांना हा प्रकार दिसला. यानंतर परशुराम पाटील यांना त्यांच्या नातवाने घरात नेले. त्यानंतर इतर नातेवाईकांना आणि पोलिसांना फोन केला. तसेच त्यांना तेथून हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले.

विरार पोलिसांनी तक्रार दाखल झाल्यानंतर आरोपीला ताब्यात घेऊन विचारपूस केली. त्यावेळी घरगुती वादातून व कोर्टातून प्रॉपर्टीबाबत आलेली नोटीस, याचा राग मनात धरून आरोपी किरण पाटील याने वडिलांवर धारदार शस्त्राने वार केले, असे पुढे आले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.