ETV Bharat / state

तानसा अभयारण्यापासून 10 किमी अंतरावरील  कंपन्यांना प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून कंपनी बंदची नोटीस - Tansa

केंद्रीय पर्यावरण व वन खात्याविरोधात न्यायालयात  नॅशनल ग्रीन ट्रीब्यूनल न्यू दिल्ली यांनी 105/2018 ने  अपील दाखल केले होते. ठाणे आणि पालघर सीमा भागातील तानसा अभयारण्य इको सेंसेटिव्ह प्रभागात मोठ्या प्रमाणात जमीन उत्खनन, जल, वायू आणि ध्वनी प्रदूषण केले जात आहे. हे प्रदूषण करणाऱ्यांना प्रतिबंध करावा. अभयारण्याच्या सीमा भागापासून दहा किलोमीटर अंतरापर्यत प्रदुषण निर्माण करणारे उद्योग व कारखाने बंद करावेत. यावर 27 फेब्रुवारी 2019 ला सुनावणी झाली.

तानसा अभयारण्यापासून 10 किमी अंतरावरील  कंपन्यांना प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून कंपनी बंदची नोटीस
author img

By

Published : May 15, 2019, 7:56 PM IST

पालघर (वाडा ) - तानसा अभयारण्यातील दहा किलोमीटर अंतरातील जल, वायू, ध्वनी आणि इतर प्रदूषण निर्माण करणारे कारखाने बंद करावेत, अशा नोटीस महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण बोर्डाकडून वाडा तालुक्यातील कंपन्याना देण्यात आल्या आहेत. नोटीसमुळे येथील कारखानदारात खळबळ माजली आहे. यामुळे येथील रोजगार व इतर उद्योगांना खीळ बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या निर्णयात माती उत्खननावर बंदी येत असल्याने वीटभट्टी व्यवसाय अडचणीत येत आहेत. त्यामुळ जनसामान्यांनकडून संतापाची लाट उसळत आहे.

केंद्रीय पर्यावरण व वन खात्याविरोधात न्यायालयात नॅशनल ग्रीन ट्रीब्यूनल न्यू दिल्ली यांनी 105/2018 ने अपील दाखल केले होते. ठाणे आणि पालघर सीमा भागातील तानसा अभयारण्य इको सेंसेटिव्ह प्रभागात मोठ्या प्रमाणात जमीन उत्खनन, जल, वायू आणि ध्वनी प्रदूषण केले जात आहे. हे प्रदूषण करणाऱ्यांना प्रतिबंध करावा. अभयारण्याच्या सीमा भागापासून दहा किलोमीटर अंतरापर्यत प्रदुषण निर्माण करणारे उद्योग व कारखाने बंद करावेत. यावर 27 फेब्रुवारी 2019 ला सुनावणी झाली. या निर्णयाची अंमलबजावणी म्हणून वाडा तालुक्यातील 40 हून अधिक कंपन्यांना कारखाने का बंद करू नयेत, अशी नोटीस बजावण्यात आली आहे. त्यामुळे इथल्या रोजगाराबरोबरच कारखानदारीला हादरा बसला आहे.

वाडा तालुक्यात शीतपेय बनविणारी कोकाकोला, दूरसंच निर्माण करणारी ओनिडा आणि टूथपेस्ट उत्पादन करणारी एस्सल प्रो पॅक या मल्टीनँशनल कंपन्यासह स्टील रोलींग मिल व रासायनिक प्रक्रिया करणाऱ्या 200 हून अधिक कंपन्याना या निर्णयाचा फटका बसणार आहे. माती उत्खनन करणाऱ्या वीटभट्टी आणि खाण व्यवसायिकाना याचा फटका बसणार आहे.

एकीकडे तालुक्यात रोजगार खुंटत जाऊन बेरोजगारी समस्या बोकालली आहे. अशातच कारखानदारी बंद झाली तर इथल्या बेरोजगारीचा प्रश्न आहे. दरम्यानच्या काळात काही भागात इको सेंसेटिव्ह झोन असतानाही गॅस प्रकल्प नेले.त्या गॅस प्रकल्पाने बाधीत शेतकऱ्यांना वाजवी मोबदला तर सोडाच.शेतकरीवर्गाला शेती करणे,सिंचनासाठी विंधन स्रोत उभा करणे अवघड झाले आहे. या भागात ना शेती करता येत नाही ना उद्योग उभा करता येत.अशा निर्णयामुळे मग रोजगाराच्या वाटा कशा निर्माण होतील.या निर्णयावर आचारसंहितानंतर फेरविचार व्हावा असं यावर सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार पाटील यांनी व्यक्त केले.

Intro:Body:

palghar wada news

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.