पालघर - करवाले गावात सफाळे पोलीसांनी जुगार खेळणाऱ्या आरोपींवर कारवाई केली असून ५१ हजार ८४० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी सफाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सफाळे पोलीस ठाणे हद्दीतील करवाले (सफाळे पूर्व) गावात मुख्य रस्त्याच्या बाजूस विहीरी जवळील दुमजली इमारतीच्या नवीन बांधकाम बंद खोलीत जुगार खेळत होते. सफाळे पोलीसांनी गुप्त माहितीच्या आधारे छापा टाकून सात इसमाना ताब्यात घेतले.
सुरज भानुदास वैद्य, राजेश नथुराम किडरा, अमर संतोष शेलार, प्रशांत मधुकर शिंदे, प्रकाश अनंत पवार, सचिन दत्ताराम रहाटवल, संदीप पांडुरंग शेलार, असे सात आरोपी तीन पत्ती जुगार खेळताना मिळून आले.
सदरच्या कारवाईत ५१ हजार ८४० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तर आरोपींविरोधात सफाळे पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार कायदा कलम ४ ,५, १२( अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक केलेल्या सर्व आरोपींची जामिनावर सुटका करण्यात आली आहे.
सदरची कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी व कर्मचारी यांनी केली.