ETV Bharat / state

वसईत फळविक्रेत्याकडून गावठी कट्ट्यांसह जिवंत काडतूसे हस्तगत

स्थानिक गुन्हे शाखेने पकडलेला आरोपी हा फळविक्रीचा व्यवसाय करत असल्याचे समोर आले आहे. हे गावठी कट्टे व जिवंत काडतूसे त्याने युपीवरून आणले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

फळविक्रेत्याकडून गावठी कट्टे जिवत काडतूसे जप्त
author img

By

Published : Oct 17, 2019, 3:22 PM IST

Updated : Oct 17, 2019, 4:07 PM IST

पालघर/ वसई - स्थानिक गुन्हे शाखा वसई युनिटकडून नालासोपारा अलकापुरी येथे संतोष मदनबाबू नायर या व्यक्तीकडून चार गावठी कट्टे व आठ जिवंत काडतूसे हस्तगत केली आहेत. सदरची कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी जितेंद्र वनकोटी व स्थानिक गुन्हे शाखेच्या सिद्धवा जायभाये यांच्या पथकाने केली आहे. या शस्त्रांची किंमत 41 हजार 600रुपये आहे. दोनच दिवसांपूर्वी बहुजन विकास आघाडी पक्षाचे उमेदवार हितेंद्र ठाकूर यांनी विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत घातपात घडवला जाणार असल्याची माहिती प्रसारमाध्यमांना दिली होती.

वसईत फळविक्रेत्याकडून गावठी कट्ट्यांसह जिवंत काडतूसे हस्तगत

हेही वाचा - ओमराजेंनी लोकांचे संसार बुडवल्याचा राग म्हणून केला हल्ला; आरोपीचा व्हिडिओ व्हायरल

स्थानिक गुन्हे शाखेने पकडलेला आरोपी हा फळविक्रीचा व्यवसाय करत असल्याचे समोर आले आहे. हे गावठी कट्टे व जिवंत काडतूसे त्याने युपीवरून आणले असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी आरोपीला न्यायालयात हजर केले असता, 20 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Intro:वसईत फळविक्रेत्याकडे चार गावठी कट्टे व आठ जीवंत काडतूसे सापडली...
Body:स्लग : वसईत फळविक्रेत्याकडे चार गावठी कट्टे व आठ जीवंत काडतूसे सापडली...

निवडणूकीच्या ऐन रणधुमाळीत स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई...

पालघर/ वसई : स्थानिक गुन्हे शाखा वसई युनीटकडून नालासोपारा अलकापूरी येथे संतोष मदनबाबू नायर या मूळचा एरोली नवी मूंबई येथील आरोपीला अटक करून त्याच्याकडील चार गावठी कट्टे व आठ जीवंत काडतूसे हस्तगत केली आहे.सदरची कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी जितेंद्र वनकोटी व स्थानिक गुन्हे शाखेच्या सिद्धवा जायभाये यांच्या पथकाने केली आहे.या शस्त्रांची किंमत 41600रूपये आहे. दोनच दिवसांपूर्वी बहुजन विकास आघाडी पक्षाचे उमेदवार हितेंद्र ठाकूर विधानसभा निवडणूकीच्या रणधुमाळीत घातपात घडवला जाणार असल्याची माहिती प्रसार माध्यमांना दिली होती.
स्थानिक गुन्हे शाखेने पकडलेला आरोपी हा फळविक्रीचा व्यवसाय करतो असे सभोर आले आहे.हे गावठी कट्टे व जिवंत काडतूसे त्याने युपी वरून आणले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.पोलिसांनी आरोपीला कोर्टात सादर केले असता न्यायालयाने 20 ऑक्टोबर पर्यंत पोलिस कस्टडी सुनावली आहे.

बाईट 1 : सिद्धवा जायभाये , स्थानिक गुन्हे शाखा पालघरConclusion:
Last Updated : Oct 17, 2019, 4:07 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.