ETV Bharat / state

विरारमध्ये ५१ लाखांच्या बनावट 'एन ९५' मास्कचा साठा जप्त - news about corona

विरार येथे केलेल्या कारवाईत ’एन ९५’ मास्कचा ५१ लाख रुपये किमतीचा साठा पोलिसांनी जप्त केला. प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे.

police-seize-51-lakh-fake-n94-masks-in-virar
विरारमध्ये ५१ लाखांच्या बनावट 'एन ९५' मास्कचा साठा जप्त
author img

By

Published : Apr 14, 2020, 10:37 PM IST

पालघर - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात मास्कची मागणी वाढत असताना, विरार येथे केलेल्या कारवाईत ’एन ९५’ मास्कचा ५१ लाख रुपये किमतीचा साठा स्थानिक गुन्हे शाखेच्या वसई युनिटने जप्त केला. विशेष म्हणजे हे सर्व मास्क वापरलेले असून ते धुवून पुन्हा विक्रीसाठी आणले जात होते, याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे.

विरार पूर्व गडगापाडा परिसरातील एका घरात बोगस ’एन 95’ मास्कचे मोठे रॅकेट सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखा वसई युनिटला मिळाली होती. त्यानुसार सोमवारी रात्रीच्या सुमारास पोलिसांनी छापा मारून ही कारवाई केली. जप्त केलेल सर्व मास्क धुवून, इस्त्री करून पुन्हा पॅकिंग करून बाजारात विक्रीसाठी आणले जात होते. हे सर्व मास्क भिवंडी येथून विरारमध्ये आणले जात होते. हे मोठे रॅकेट असल्याची शंका पोलिसांनी वर्तवली आहे. या प्रकरणी नागराज पिल्ला (३३), रोहित कोठरी (३०), मोहोम्मद नौशाद शेख (२८) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यावर विरार पोलिस ठाण्यात कलम ४२०, २६९, २७० सह अत्यावशक वस्तू अधिनियमानुसार १९५५ चे कमल ३ (८), साथीचे रोग प्रतिबंधक कायदा कलम २, ३, ४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.