नालासोपारा(पालघर) - नालासोपारा येथे २०१९ मध्ये शस्त्रांचा धाक दाखवून दरोडा टाकणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या टोळीला तुळींज पोलिसांनी जेरबंद केले आहे. या कारवाईत पोलिसांनी चोरीस गेलेला सर्व मुद्देमाल हस्तगत केला आहे.
नालासोपारा पूर्वेकडील सेंट्रल पार्क रोड येथील गोल्ड फायनान्सच्या ऑफीसमध्ये २० सप्टेंबर २०१९ च्या सकाळी साडे दहा वाजताच्या सुमारास काही अनोळखी व्यक्तींनी सशस्त्र दरोडा टाकला. आरोपींनी ऑफीसमधील सर्व अधिकारी, कर्मचारी यांना शस्त्राचा धाक दाखवून तब्बल १ कोटी ७६ लाख ८७ हजार १३५ रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम, असा मुद्देमाल लुटला होता. या प्रकरणी सुप्रज्ञा आनंद कदम (२४) यांनी तुळींज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून गुन्हा नोंद करण्यात आला होता.
या प्रकरणाचा तपास करून पोलिसांनी १० आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी केली. या चौकशी दरम्यान अनेक गंभीर गुन्हे उघडकीस आले. त्यानंतर गुन्ह्यांचे गांभिर्य पाहुन गुन्ह्यात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) कायद्या अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला. तसेच आरोपींकडून गोल्ड फायनान्समधील दरोड्यातील गेलेला माल आणि गुन्हयातून आरोपींना मिळालेला मोबादला, त्या रकमेतून खरेदी केलेल्या स्थावर मालमत्त तसेच सोन्याचे दागिने व सोन्याच्या लगडी, एक रिव्हॉल्वर, एक पिस्टल, ८ जिवंत काडतूसे, एक ईनोव्हा कार, एक प्रवासी रिक्षा असा एकुण १,८२,६४,१७५ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
नालासोपाऱ्यात गोल्ड फायनान्सवर दरोडा टाकणारी टोळी गजाआड; लाखोंचा मुद्देमाल हस्तगत - robbery in nalasopara