पालघर - नालासोपारा पश्चिमेकडील परिसरात पाळणाघरात एका ७ वर्षीय मुलीवर पाळणाघर चालकाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल करुन ५६ वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे.
आरोपीला पोलीस कोठडी -
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नालासोपारा पश्चिम येथे राहणाऱ्या एका नोकरी करणाऱ्या दाम्पत्याने आपली ७ वर्षीय मुलगी एका पाळणागृहात सांभाळ करण्यासाठी ठेवली होती. या पाळणाघर सांभाळणाऱ्याने मागील दीड महिन्यापासून ते सोमवारपर्यंत या मुलीशी अश्लील चाळे करत तिच्यावर अत्याचार केला. मुलगी जखमी झाल्याने सर्व प्रकार उघडकीस आला. मुलीच्या पालकांनी नालासोपारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे. नराधम आरोपीस नालासोपारा पोलिसांनी बेड्या ठोकून वसई न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला २४ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भाविका माहीमतुरा करीत आहेत.
हेही वाचा - बीड : विजेचा धक्का लागल्याने मायलेकीचा मृत्यू; माजलगाव येथील घटना