ठाणे - मिरा भाईंदरचे भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्याविरोधात आज (शुक्रवारी) मिरा रोड पोलीस ठाण्यात बलात्कार व फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. भाजप नगरसेविकेने आज पहाटे साडे तीनच्या सुमारास तशी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर मात्र या प्रकरणावर बोलायला पोलीस उपअधीक्षक शांताराम वळवी यांनी मौन बाळगले आहे.
हेही वाचा - भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
काय आहे प्रकरण?
भाजपच्या एका नगरसेविकेने पोलीस महानिरीक्षक, कोकण विभाग नवी मुंबई व पोलीस अधीक्षक ठाणे ग्रामीण यांच्या कार्यालयात माजी आमदार माजी आमदार नरेंद्र लालचंद मेहता यांच्या विरूद्ध २५ फेब्रुवारीला अर्ज देवून समाज माध्यमावर व्हिडिओ व्हायरल केला होता. पीडित नगरसेविकेचे लग्न जानेवारी १९९९ सोन्स नावाच्या व्यक्ती सोबत झाले होते. दरम्यान, दोघांमध्ये वाद होत असल्याने त्या वेगळ्या राहत होत्या. 'ब्यू मुन क्लब' ऑफीसमध्ये मार्केटींग एक्सीक्युटीव्ह म्हणून १९९९ मध्ये काम करीत असताना त्यांची ओळख क्लबचे मॅनेजींग डायरेक्टर नरेद्र लालचंद मेहता यांच्याशी झाली. तेव्हा पासून मेहतांची त्यांच्याशी जवळीक वाढली.
मेहता यांनी लग्नासाठी विचारणा केली असल्याचे पिडीतेने तक्रारीमध्ये म्हटले असून, १३ जुन २००१ डहाणूच्या महालक्ष्मी मंदीरात त्यांनी लग्न केले. ही गोष्ट कोणालाही सांगू नको म्हणून, मेहता यांनी पीडितेला बजावले. त्यानंतर पीडिता गरोदरही राहिल्या मात्र, मेहता २००२ मध्ये मिरा भाईंदर महानगर पालीकेत नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर पीडितेकडे दुर्लक्ष केले असल्याचे पीडितेने पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे.
पीडिता मेहता यांच्या बाळाची आई होणार हे माहीत असून, देखील त्यांनी दुसरे लग्न केले. पीडितेला मुलगा झाल्यानंतर तिची समजूत काढण्यासाठी मेहता त्यांच्या घरी गेले. मात्र, पीडितेने लग्न केल्याचे जाहिर केले नाही तर 'जीव देईन' असे सांगितले. मात्र, पीडितेने शेवटी मेहता व त्यांचा मित्र संजय थरथरे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली असून या प्रकरणी मिरारोड पोलीस उपअधीक्षक शांताराम वळवी यांनी कॅमेऱ्यासमोर बोलण्यास नकार दिला आहे. पोलीस नरेंद्र मेहता व त्याचा मित्र संजय थरथरे यांनी कधी अटक करतात हे आता पाहावे लागणार आहे.
हेही वाचा - 'त्या' विद्यार्थिनीचा मृत्यू शिक्षकामुळेच, परीक्षा चुकवण्यासाठी सुचवला 'भयंकर उपाय'..